शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

वडूज नगरपंचायतीला गृहप्रवेशाची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:44 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराला नगरपंचायतीचे स्वरूप प्राप्त होऊन साडेचार वर्षे लोटली. मात्र, आजपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराला नगरपंचायतीचे स्वरूप प्राप्त होऊन साडेचार वर्षे लोटली. मात्र, आजपर्यंत नगरपंचायतीला प्रशस्त इमारत काही मिळाली नाही. येथील तहसील कार्यालय नूतन प्रशासकीय इमारत स्थलांतरित झाल्यानंतर तहसील कार्यालयाची दगडी बांधकाम असलेली भव्य इमारत धूळखात पडून आहे. ही इमारत नगरपंचायतीसाठी मिळावी, हे वडूजकरांचे स्वप्न अजूनही अपुरेच आहे.

शहरातील मुख्य आणि भव्य जागेत २ सप्टेंबर १९६८ साली १ हजार ७४९ चौरस मीटर इतकी भव्यदिव्य दगडी इमारत बांधण्यात आली. ही इमारती आजअखेर सुस्थितीत आहे. इमारतीच्या समोर आणि अवतीभवती असलेली मोकळी जागाही वापराविना पडून आहे. येथील भूमिपुत्रांनी कवडीमोल दराने ही मुख्य जागा शासनाला हस्तांतरित केली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या इमारतीचे दिमाखात उद्‌घाटन झाल्याचे वडूजकरांना ज्ञात आहे. यापूर्वी या इमारतीत तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, दुय्यम निबंधक, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, उपकोषागार कार्यालय, निवडणूक शाखा विभाग, रेव्हेन्यू क्लब आदींसह महसूल विभागांतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज चालत होते; परंतु काही वर्षांपूर्वीच सुसज्ज असलेल्या प्रशासकीय इमारतीत सर्वप्रथम तहसील कार्यालयाने आपले ठाण मांडले. यासाठी तत्कालीन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी समयतत्परता दाखवीत आपले कार्यालय तातडीने नव्या प्रशासकीय इमारतीत स्थानापन्न केले. मात्र, तहसील कार्यालयाची जुनी दगडी इमारत अक्षरक्ष: वास्तव्याविना धूळखात पडून आहे.

अडगळीत व पार्किंग व्यवस्था नसलेल्या इमारतीमध्ये सध्या नगरपंचायतीचे कार्यालयीन कामकाज सुरू आहे. यामुळे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिक कोंडी होत आहे. कोरोना काळात शहरातील नागरिकांना सुज्ञ करणारे नगरपंचायत प्रशासन मात्र कोरोनाला आव्हान देत उर्वरित व अंतिम काळातील कामकाजात व्यस्त आहे.

(चौकट)

..तर शहराच्या वैभवात भर

वडूज शहराची व्याप्ती पाहता दगडी इमारत व मोकळी जागा नगरपंचायत व शहराच्या वैभवात निश्चित भर टाकेल. या इमारतीत नगरपंचायतीने आपले बस्तान बांधले तर, या इमारतीमध्ये स्वतंत्र नगरपंचायतीचे विभाग तयार होऊन नागरिकांसह, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होऊ शकतो, तसेच भव्य खुल्या जागेत नगरपंचायतीने विविध उपक्रम राबविल्यास उत्पन्नातही वाढ होऊ शकते. शहराच्या मध्यभागी असलेली ही इमारत सर्व सोयीयुक्त असल्याने व इमारतीच्या हाकेच्या अंतरावरच बसस्थानक, नूतन प्रशासकीय इमारत आणि नव्याने होत असलेली पोलीस ठाण्याची ग्रीन इमारतदेखील आहे. त्यामुळे नगरपंचायत जुन्या तहसील कार्यलयात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

(चौकट)

आता नाही येणे-जाणे.....!

वडूज नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी दिग्गजांसह नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरातील व्यक्तीला जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सदस्य म्हणून मिरवता येणार नाही. त्यामुळे नगरसेवक होण्यासाठी त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. ही शेवटची नामी संधी लक्षात घेऊन आणि ‘आता नाही येणे-जाणे’ या अभंगाच्या ओवीचे महत्त्व समजून नगरपंचायत जुन्या तहसीलमध्ये स्थलांतरित करावी, असा सूर वडूजकरांमधून उमटत आहे.

फोटो : १० वडूज