छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. त्यामुळेच, तरुणाई शिवाजी महाराजांचे विचार स्वत:मध्ये रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करते. त्यासाठी, आपल्या घरावर, वाहनांवर, दुकानांवर किंवा कपड्यांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो किंवा त्यांचे नाव लिहित असते. अनेकजण आपल्या वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावतात, तर काही जण वाहनांमध्ये शिवाजी महाराजांच्या लहान मुर्तींची स्थापनाही करतात. मात्र, कराडमधील एका युवकाने आपल्या रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांसह रायगडची प्रतिकृती तयार केली आहे. त्यामुळे, कराडकरांना चालता-फिरता रायगड पाहाता येत आहे.
कराडमधील एका युवकाने शिवकन्या नावाच्या आपल्या रिक्षाची सुंदर आणि अतिशय देखणी सजावट केली आहे. युवकाने रिक्षाच्या टपावर अक्षरश: किल्ले रायगडच उभारला आहे. दिवाळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याची सजावट करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि ऐतिहासिक वास्तूंचा संग्रह या किल्ल्यावर पाहायला मिळत आहे. किल्ल्यावर रायगड असं लिहिण्यात आलंय, त्यासोबतच आम्ही कराडकर, असेही या किल्ल्यावर लिहिण्यात आलं आहे. या ऑटोरिक्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काही तासांतच लाखो व्हूज व्हिडिओला मिळाले आहेत. इंस्टाग्रामवर एका अकाऊंटवरु हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. दरम्या, मी कराडकर असं लिहिल्याने ही रिक्षा कराडची असल्याचे दिसून येते.
दरम्यान, रिक्षावरील किल्ल्यास रायगड असं नाव देण्यात आलं आहे. हा सुंदर किल्ला पाहून खरंच तुम्हालाही आनंद होईल तसेच कौतुक वाटेल. M.k.boss5 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २ मिलियन्सपेक्षा अधिक नेटीझन्सने पाहिला आहे.