शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

इच्छुकांची ‘फॉर्मबाजी’ पाऊण कोटीची!

By admin | Published: January 27, 2017 11:20 PM

सारेच पक्ष मालामाल : ‘आगामी निवडणुकीचं बजेट’ कल्पनेच्या पलीकडे जाणार

सातारा : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडे फॉर्म भरण्यासाठी गर्दी वाढत असल्याने राजकीय पक्षांनी पक्षनिधी घेण्यास सुरुवात केली आहे. या ‘फॉर्मबाजी’मुळे तब्बल पाऊण कोटीची कमाई झाली आहे. यामुळे सारेच पक्ष मालामाल झाले असून आगामी निवडणुकीचं बजेट कल्पनेच्या पलीकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादीने मुलाखत देणाऱ्या इच्छुकांकडून ३ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत पक्षनिधी घेतला. काँगे्रसने प्रत्येकी ५ हजार रुपये, भाजपने प्रत्येकी ५०० रुपये घेऊन सदस्यपद बहाल केले. तर शिवसेनेने अवघ्या ५ रुपयांच्या बदल्यात ६१५ जणांना शिवसेनेचे सदस्य करून घेतले. भाजप व शिवसेनेची केंद्र व राज्यात सत्ता आहे; परंतु दक्षिण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या दोन्ही पक्षांना प्रवेश करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. याउलट दोन्ही काँगे्रसचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाशवी वर्चस्व आहे. साहजिकच इच्छुक मंडळींनी राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांचा पर्याय शोधला आहे. या दोन्ही पक्षांनी मोठा पक्षनिधी घेऊन संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र, उमेदवारी नाकारली गेल्यास हीच मंडळी भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे अजून दोन्ही काँगे्रसने उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नाहीत. सदाभाऊ खोत यांच्याकडे साताऱ्याचे सहपालकमंत्रिपद आल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भलतेच चैतन्य असून फलटण, कोरेगाव, माण व खटाव या तालुक्यांवर या पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.‘राजकारणाचं पीक’ जोमाने वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे जोरदार दंगल सुरू झाली आहे. बैठका, मेळावे, पक्षप्रवेश यांनी भलतेच रान उठले आहे. कालचा मित्र आज शत्रू झाला. तर कालचा शत्रू आज मित्र झाला आहे. सर्वच पक्षांमध्ये भलतेच अविश्वासाचे वातावरण तयार झाल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या ६४ व ११ पंचायत समित्यांच्या १२८ जागांसाठी पुढच्या महिन्यात (दि. २१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. बालेकिल्ला टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा कस लागला आहे. काँगे्रस आपले आहे ते अस्तित्व टिकवून ठेवत आहे, त्या जागांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप शतप्रतिशतची घोषणा देत निवडणुकीत उतरली आहे. शिवसेनेने धनुष्यबाण ताणला आहे. सहपालकमंत्रिपद मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाळसे धरले आहे. (प्रतिनिधी) खासदार उदयनराजेंच्या राजधानी एक्स्प्रेसचा धडकाउदयनराजे भोसले यांच्या राजधानी सातारा एक्स्प्रेसने मुख्यत: राष्ट्रवादीला जोरदार धडक दिली आहे. भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशीही उदयनराजेंनी चर्चा केली. मात्र, त्यांची व्यूहरचना अद्याप गुलदस्त्यात आहे. अबब.. लाखांमध्येच आकडे !राष्ट्रवादी : ७८० इच्छुकांकडून सरासरी ३९ लाखकाँगे्रस : ६०० इच्छुकांकडून सरासरी ३० लाखभाजप : ३०० इच्छुकांकडून सरासरी १ लाख ५० हजारशिवसेना : ६१५ इच्छुकांकडून ३ हजार ८०