प्रमोद सुकरे ।क-हाड : ‘कोरोनाला हरविण्यासाठी अविश्रांत झटणारे योद्ध्या म्हणजे ‘आशा’ सेविका. या लढाईत या सेविका नव्या जगाच्या ‘आशा’ आहेत. मात्र म्हासोली येथे लढणारी ‘आशा’ताईच कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यातील बाधित झालेल्या त्या पहिल्या आशा सेविका असाव्यात; पण त्यामुळे आशा सेविकांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे.
माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी २००९ मध्ये ‘आशा’ सेविका ही संकल्पना आरोग्य विभागाने सुरू केली. त्यांच्याकडे गर्भवती मातेचे व दीड वर्षापर्यंतच्या लहान बाळांचे लसीकरण ही महत्त्वाची जबाबदारी आहे. साथीचे रोगाचे सर्वेक्षण करणे, कुटुंब नियोजनबाबत प्रबोधन करणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवणे, कुष्टरोग, टी. बी. यासारख्या आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणे ही कामे त्यांच्याकडून करून घेतली जातात.
कोरोनाच्या संकटात ‘आशा’ताई रणरागिणी होऊन कामे करीत आहेत. गावात बाहेरगावावरून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करणे, त्याची सर्व माहिती वरिष्ठांकडे पाठविणे, बाहेरगावावरून आलेल्या लोकांच्या आरोग्याबाबत, ताप, सर्दी लक्षणाबाबत दररोज चौकशी करणे, तशी लक्षणे आढळल्यास त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविणे ही कामे त्या करीत आहेत. पण समाजाचे आरोग्य जपताना ‘आशा’ तार्इंचेच आरोग्य धोक्यात येत आहे. हे समोर आले आहे.
आरोग्याची घेईना नीट काळजीआरोग्य विभाग आशा सेविकाच्या आरोग्याची नीट काळजी घेताना दिसत नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य काळजी घ्यावी. दहा वर्षे पूर्ण व एचबीएनसीबीचे प्रशिक्षण पूर्ण असलेल्यांना कायम करावे,’ अशी जोरदार मागणी महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्याध्यक्षा आनंदी आवघडे यांनी केली