सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विवाह सोहळा म्हटलं की डामडौल आलाचं. परंतु या डामडौल व अतिरिक्त खर्चाला बगल देत साताऱ्यात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. भारतीय संविधानाचे महत्त्व नागरिकांना कळावे याबरोबरच समता, बंधुता, एकता व महापुरुषांचे विचार समाजमनात रुजावे, यासाठी विवाहाला आलेल्या वºहाडी मंडळींना संविधानासह महापुरुषांची स्फूर्तीदायी पुस्तके भेट स्वरुपात देण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.साताºयातील प्रतापसिंहनगरात राहणारे गोकुळदास निवृत्ती उदागे व पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील सुप्रिया शिंदे यांचा रविवारी साताºयात विवाह सोहळा पार पडला. गोकुळदास उदागे हे ग्रामसेवक असून, त्यांना समाजकार्याची पूर्वीपासून आवड आहे. शाहू, फुले, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले या थोर महापुरुषांच्या विचाराने प्रभावित झालेल्या उदागे यांनी समाजात समता, बंधूता व एकता रुजविण्यासाठी काहीतरी वेगळं करावं, असा संकल्प चार वर्षांपूर्वी केला होता. त्यानुसार आपल्या विवाहात फटाके व डॉल्बीसारख्या वाद्यांवर खर्च न करता विवाहाला उपस्थित राहणाºया वºहाडी मंडळींना भारतीय संविधान व महापुरुषांची पुस्तके भेट स्वरुपात देण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्या या निर्णयाचे कुटुंबीय व मित्रपरिवारानेही स्वागत केले.गोकुळदास उदागे यांनी स्वत: तसेच मित्रांच्या मदतीने भारतीय संविधान व महापुरुषांची एक हजार पुस्तके खरेदी केली. या पुस्तकाचे त्यांनी लग्नाला आलेल्या वºहाडी मंडळींना वाटप केले. या पुस्तकांमध्ये राज्यघटनेसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, महाडचा मुक्तीसंग्राम अशा पुस्तकांचा समावेश होता. सद्य:परिस्थिती पाहता आजचा समाज महापुरुषांच्या विचारापासून भरकटत चालला आहे. जाती-पातीच्या भिंती तोडून या समाजात थोर महापुरुषांचे विचार रुजविण्याबरोबरच सर्वांमध्ये समता व बंधुता निर्माण करण्यासाठी ही पुस्तके प्रेरणादायी ठरतील, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.बोधी वृक्षाच्या लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेशगोकुळदास उदागे व सुप्रिया शिंदे यांनी रेशीमगाठ बांधण्यापूर्वी बोधी (पिंपळ) वृक्षाचे रोपण केले. बोधी वृक्षाचे वैज्ञानिक कारण म्हणजे चोवीस तास आॅक्सिजन देणारा या वृक्ष आहे. या वृक्षाचा आदर्श ठेवून प्रत्येकाने स्वत:सह इतरांच्या जीवनात आनंदरुपी प्राणवायू फुंकावा तसेच पर्यावरणाचे रक्षण करावे, असा संदेश उदागे यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून दिला.
वर्हाडी आले.. समतेचे विचार घेऊन गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 10:55 PM