शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसाठी वारकरी, महिलांनी उठाव करावा

By admin | Published: December 04, 2015 10:13 PM

शशिकांत शिंदे : चळवळीची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करू या

कोरेगाव : ‘महाराष्ट्रात केवळ चंद्रपूर व वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये झालेली दारूबंदी मर्यादीत न ठेवता एक सामाजिक विषय म्हणून शासनाने राज्यभर लागू करावी, यासाठी वारकरी व महिलांनी उठाव करावा, या चळीवळीची सुरुवात सातारा जिल्ह्यातूनच करू या,’ असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.कोरेगाव येथे पत्रकारांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी आमदार शिंदे म्हणाले, ‘बिहारमध्ये महिलांनी प्रचंड प्रमाणात मतदान करून तेथील राजकारणाच्या दिशा ठरविल्या. त्यामुळे राज्यात दारूबंदी झाली. महाराष्ट्रातही या निर्णयाचे पडसाद उमटू लागले. सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, राणी बंग, मेधा पाटकर यांनी महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. डान्सबार, दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील कर्ता व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब कोलमडून पडते. ही वस्तुस्थिती दाखवणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे शासनाने महसुली उत्पन्नाचा विचार न करता एक सामाजिक प्रश्न म्हणून या विषयाकडे बघावे.’‘साताऱ्यात अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांच्याबरोबर इतरही महिलांनी संघटनांच्या प्रतिनिधी तसेच वारकरी संघटना आहेत. या संघटनांनी दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा. दारूबंदीच्या चळवळीच्या पाठीशी मी ठामपणे उभा असेन,’ अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)