शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

By admin | Published: July 04, 2017 10:49 PM

प्रति पंढरी करहरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

लोकमत न्यूज नेटवर्कसायगाव : प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जात असलेल्या जावली तालुक्यातील करहरनगरीत लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला मंगळवारी लाखो वारकऱ्यांचा मेळा जमला होता.आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी सात वाजता पांडुरंगाची महापुजा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, बाजारसमिती संचालक राजुशेठ गोळे मान्यवर उपस्थित होते. ग्यानबा तुकारामऽऽऽ’च्या गजरात प्रत्येक वारकऱ्याने आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. तालुक्यासह जिल्ह्यातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे चार तास रांगेत उभे राहूनही त्यांच्या मुखावर पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे समाधान दिसत होते. रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले.परिसरातील काटवली, बेलोशा, दापवडी, खिंगर, राजपुरी, इंदवली, करंदी, कुडाळ, म्हसवे, सरताळे, सायगाव या ठिकाणाहून आलेल्या वारकरी मंडळांच्या दिंड्याही येथे सहभागी झाल्या होत्या. यावेळी शिवसेनेचे जावळी-सातारा विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे संपर्कप्रमुख अशोक पवार, नामदेव वेंदे, शंकर सणस, उद्योजक दादासाहेब कासुर्डे यांच्या वतीने तर पाचवड-करहर-पाचगणी जीप चालक-मालक संघटनेच्या वतीने भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. वसंतराव मानकुमरे सहकारी पतसंस्था, ज्ञानशक्ती सहकारी पतसंस्था, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था, जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे यांच्या मार्फत व निरंजना प्रतिष्ठान यांच्या वतीनेही भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.भाविकांसाठी गैरसोय टाळण्यासाठी देवस्थानतर्फे उपाययोजना केल्या होत्या.विशेष मुलंही वारकऱ्यांच्या वेशातकाटवलीपासून पायी दिंडीस सुरुवात करून करहरपर्यंत भावकांनी पायी दिंडी काढली होती. हुमगाव, हातगेघर, आखाडे, काटवली, बेलोशी, खर्शिबारामुरे या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्ररथांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. तर वाई तालुक्यातील पाचवड येथील आपुलकी मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात काढलेली पायी दिंडी सगळ्यांचे आकर्षण ठरले.