वाई : वाई तालुक्यातील वासोळे येथील राखीव वनक्षेत्रास आग लावताना रंगेहाथ पकडलेल्या चंद्रभागा संतोष कोंढाळकर या आरोपीस तीन हजार रुपयांचा दंड व सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली़.वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, वासोळे येथे चंद्रभागा कोंढाळकर ही महिला ७ एप्रिल रोजी शेतातील बांध पेटवत असताना शेजारील राखीव क्षेत्रास आग लागली. त्यामुळे दहा हेक्टर राखीव वनक्षेत्र जळून खाक झाले़ चंद्रभागा कोंढाळकर यांना २१ सप्टेंबर रोजी न्यायालयापुढे उभे केले असता तीन हजार रुपयांचा दंड व सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली.निकाल तारखेसच दंड भरला. गेल्या वर्षी एकूण वीस वणवा लावण्याच्या प्रकरणात आरोपींना शिक्षा झाल्याने पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे़ वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वाशिवली भा. को. कदम, वनसंरक्षक जांभळी संदीप पवार, वनरक्षक वासोळे प्रदीप जोशी यांनी परिश्रम घेतले़उन्हाळ्याच्या दिवसात समाजातील विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोक अनेक ठिकाणच्या डोंगराला गैरसमजुतीतून वणवे लावले लावतात; पण यामुळे पर्यावरणाचे अपरिमित कधीही भरून न येणारे नुकसान होते़ यासाठी नागरिकांनी मानसिकता बदलली पाहिजे़ खासगी किंवा वनविभागाच्या क्षेत्रास वणवा लावल्यास दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात, अशी माहिती वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
वणवा लावल्याप्रकरणी वासोळे येथील महिलेस सात दिवसांची कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 5:42 PM
वाई तालुक्यातील वासोळे येथील राखीव वनक्षेत्रास आग लावताना रंगेहाथ पकडलेल्या चंद्रभागा संतोष कोंढाळकर या आरोपीस तीन हजार रुपयांचा दंड व सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली़.
ठळक मुद्देवणवा लावल्याप्रकरणी वासोळे येथील महिलेस सात दिवसांची कैदतीन हजारांचा दंड : वनक्षेत्रास आग लावताना रंगेहाथ पकडले