सातारा : ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, जवळपास चार हजार पोलीस बंदवर ‘वॉच’ ठेवणार आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाचा भाग म्हणून क्रांतिदिनी (९ आॅगस्ट) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काही संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला पाच एसआरपी, दोन आरसीपीच्या तुकड्या आणि पाच स्टाईकिंग फोर्सची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांची कुमकही मागविण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास चार हजार पोलिसांचा वॉच या बंदवर असणार आहे.साध्या वेशातील पोलिसांवर मदार..गेल्या महिन्यात मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी तोडफोड अन् दंगलीचा प्रकार घडला होता. त्यावेळी साध्या वेशातील पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला होता. काही तोडफोड करणारे युवक आणखी दंगल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती साध्या वेशातील पोलिसांनी दिली होती. गुरुवारच्या बंद काळातही साध्या वेशातील पोलिसांवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.जमावाचा हल्ला अन् पोलिसांचे प्रत्युत्तरखंडाळा : तरुणांचा गोंगाट, जमावाचा हल्ला आणि त्यावर पोलिसांनी केलेला प्रतिबंध यामुळे खंडाळा येथील बसस्थानकावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे पाहणाºयांच्या नजरा विस्फारल्या. मात्र, मराठा क्रांती मोर्चाच्या ९ आॅगस्ट रोजी होणाºया बंदच्या पार्श्वभूमीवर खंडाळा पोलिसांनी जमाव पांगविण्याचे प्रात्यक्षिक केले असल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.मराठा क्रांती मोर्चाचा अखेरचा टप्पा म्हणून शासनाला ९ आॅगस्टचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने दिलेल्या सूचनांनुसार खंडाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा येथे जमाव पांगवणे, ऐनवेळी उद्भवणाºया आपत्तीला सामोरे जाणे यासाठी पोलीस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या पथकांसह खंडाळा येथील स्थानिक पोलीस जवानांनी हे प्रात्यक्षिक केले.खंडाळा बसस्थानकावर सायंकाळच्या वेळी महाविद्यालयातील मुलांची मोठी गर्दी असते. त्यावेळी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. पोलिसांनी अचानक केलेल्या या प्रात्यक्षिकामुळे बसस्थानकावर काही काळ गोंगाट निर्माण झाला. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खंडाळा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवरएसटी बसेसच्या सर्व फेºया रद्दसातारा : ‘मराठा आरक्षणप्रश्नी नऊ आॅगस्ट क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा विचार करून गुरुवारी पहाटेपासूनच एसटीच्या फेºया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती आटोक्यात असल्याचा निरोप पोलिसांकडून मिळाल्यानंतर त्या दुपारनंतर पूर्ववत करण्यात येतील,’ अशी माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.क्रांतिदिनी होणाºया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेतून एसटीच्या सर्व फेºया पहाटेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन शांततेत होण्याची शक्यता वर्तविली आहे. दुपारी साडेतीननंतर आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलिसांकडून निरोप मिळाल्यानंतर एसटीच्या फेºया पूर्ववत करण्यात येणार आहेत.