शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

बसस्थानकात पाणी पिताय? सावधान!

By admin | Published: October 10, 2016 12:00 AM

टाकी अस्वच्छतेच्या विळख्यात : गुटखा, तंबाखू, दारूच्या बाटल्या अन् कचऱ्याचे ढीग

सातारा : लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना तहान लागल्यानंतर दररोज शेकडो प्रवासी बसस्थानकातील पाणी पिऊन तहान भागवतात; पण प्रवाशांनो सावधान... कारण सातारा बसस्थानकातील टाकीत पाणीपुरवठा होत असलेल्या भूसमान टाकीत गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्या अन् माती मिश्रित पाणी जात असून, ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या थांबतात. त्या ठिकाणी सुमारे तीस ते चाळीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची साठवण टाकी आहे. ही टाकी खूप जुनी आहे. या टाकीत जीवन प्राधिकरणामार्फत नळाद्वारे पाणी सोडले जाते. या टाकीतूनच पाणी उचलून पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सोडले जाते. या टाकीची दुरवस्था झाली आहे. टाकीकडेला मातीचा थर साठला आहे. अनेक प्रवासी तंबाखू, गुटखा खाऊन या टाकीवरच थुंकत आहेत. त्याचप्रमाणे रात्री दारू पिऊन बाटल्या टाकीत तसेच कडेला टाकतात. तर अनेकजण टाकीच्या कोपऱ्यात नैसर्गिक विधी उरकतात. टाकीला दोन ठिकाणी झाकणे आहेत. त्यातील एक कायम झाकलेले तर दुसरे सिमेंटच्या पत्र्याने झाकले आहे. त्याचपद्धतीने जलवाहिनीसाठी मोठे छिद्र तयार केले आहे. यामधून पावसाचे पाणी, तसेच माती, दारू, गुटखा, तंबाखू मिश्रित पाणी जाते. अन् तेच पाणी पुन्हा टाकीतून प्रवासी पितात. त्यामुळे ही टाकी बंदिस्त करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी) टाकीत माती अन् प्लास्टिक कागद या टाकीची पंधरा दिवसांपूर्वीच स्वच्छता केली. त्यावेळी टाकीतून मोठ्या प्रमाणात माती, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कागदाबरोबरच चुन्याच्या डब्याही आढळल्या. त्यामुळे त्यातील पाणी आरोग्याला अपायकारक असल्याचे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. टाकी लवकरच बंदिस्त करणार टाकीवरील दोन्ही झाकणे तयार असून, ते बसविले जाणार असून, टाकी भोवती पत्रा मारून ती बंदिस्त केली जाणार आहे, अशी ग्वाही राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.