शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: October 27, 2023 2:04 PM

धरणातील पाण्यावर तीन सिंचन योजना..

सातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नाही. त्यातच पावसाअभावी सिंचनासाठी मागणी वाढत आहे. त्यानुसर आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरणात सध्या ८९ टीएमसीवरच साठा शिल्लक आहे.महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच पिण्यासाठीही पाण्याची तरतूद आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठीही पाणी विसर्ग करण्यात येतो. धरणाच्या आतापर्यंतच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात कोयना धरण नऊ वेळा भरलेले नाही. यावर्षी तर पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा ९३ टीएमसीपर्यंतच पोहोचला. सध्या धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. साताऱ्यासह इतर जिल्ह्यातही कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याचे तसेच योग्य वापराच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरीही दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी एकपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन त्यातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. तर एक महिन्यापूर्वीही सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्याने धरणातून पाणी विसर्ग करण्यात आलेला. गेल्या दोन महिन्यात तीनवेळा सांगलीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे.

धरणातील पाण्यावर तीन सिंचन योजना...कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यातील सिंचनासाठीही दिले जात आहे.

कोयना परिसरात पाऊस कमी...जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिले आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा आतापर्यंत ४०६० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजाला ५६४२ आणि महाबळेश्वरला ५४५१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे अनेक धरणे यंदा भरलेली नाहीत. परिणामी यंदा पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढतच जाणार असल्याने धरणसाठा वेगाने कमी होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीWaterपाणीKoyana Damकोयना धरण