सातारा : सांडपाण्याचा निचरा व्हावा, यासाठी सदर बझार परिसरात केवळ दोन फुटांची बंदिस्त पाईपलाईन टाकली आहे. ही जलवाहिनी तोकडी पडत आहे. पाऊस पडताच सदर बझार परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते. दहा वर्षांपासून ही समस्या कायम आहे. पालिकेने ही बाब गांभीर्याने न घेतल्याचे दिसून येत आहे.सदर बझार येथील मुख्य चौक, ग्रंथालय परिसर, बागवान गल्ली, कुरेशी गल्ली व नवीन भाजी मंडई या परिसरातील सांडपाण्याची जलवाहिनी नवीन भाजीमंडई जवळील चेंबरला जोडली आहे. या चेंबरला पाच ते सहा ठिकाणच्या सांडपाणी वाहून नेहणाऱ्या एक व दोन फुटांच्या सिमेंट पाईप जोडल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणचे सांडपाणी एकाच चेंबरमध्ये जमा होत आहे.
परिसरातील अनेक नागरिक याच चेंबरमध्ये कचरा, खरकटे पाणी टाकतात. त्यामुळे चेंबरमधून पाण्याचा निचरा होत नाही. पालिकेकडूनही या चेंबरची वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असते. गेल्या दहा वर्षांपासून ही परिस्थितीत जैसे थे आहे.रविवारी झालेल्या पावसामुळे येथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. कचरा व पाण्यामुळे मुख्य चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत नागरिकांच्या घरात शिरले. पाण्यामुळे घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. पाणी घराबाहेर काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. या पाण्यामुळे रस्तेही जलमय झाले होते. येथील ग्रंथालयाच्या मागील बाजूस कृत्रिम ओढा होता. त्या ओढ्यातून सदर बझार परिसरातील सर्व सांडपाणी वाहून जात होते. परंतु या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडईमुळे या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईन टाकली.तुंबलेले ओढे, नाले पुन्हा प्रवाहितआरोग्य विभागाकडून स्वच्छता : नगराध्यक्षांकडून कामाची पाहणी; उपाययोजनेचा अभावसातारा : पावसामुळे तुंबलेल्या नाले व गटारांची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोमवारी तातडीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्षा माधवी कदम, आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला स्वच्छतेच्या सूचना केल्या.सातारा शहर व परिसरात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सर्वच ओढे, नाले पाण्याचे तुडुंब भरून वाहिले. परंतु काही ठिकाणी कचरा व मातीमुळे ओढे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. प्रामुख्याने सदर बझार परिसरात अनेक ठिकाणी नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. आरोग्य विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी काही ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून नाले व ओढ्यांच्या स्वच्छता केली.
सोमवारी सकाळी शनिवार पेठ, यादोगोपाळ पेठ, गांधी क्रीडा मंडळ, कमानी हौद, केसरकर पेठ, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, राजवाडा परिसर आदी ठिकाणच्या नाल्यांची तसेच चेंबरची स्वच्छता करण्यात आली. सदर बझार परिसरातील कचºयाने तुडुंब भरलेले ओढेही पुन्हा प्रवाहित करण्यात आले. नगराध्यक्षा माधवी कदम व आरोग्य सभापती यशोधन नारकर, नगरसेविका स्नेहा नलवडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांनी सदर बझार येथील नागरिकांशी संवाद साधला.सदर बझार येथे पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांची सोमवारी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पाहणी केली. यावेळी डावीकडून राजेंद्र कायगुडे, यशोधन नारकर, स्नेहा नलवडे उपस्थित होते.स्वच्छतागृहातील मैला रस्त्यावरसदर बझार येथील चेंबरला लागूनच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाच्या टाक्याही उघड्या पडल्या आहेत. रविवारी झालेल्या पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये गेल्याने टाक्यातील मैला पाण्याबरोबर रस्त्यावरून वाहून जात होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
घरात सापाची पिल्लेघरात शिरलेले पावसाने पाणी बाहेर काढताना नागरिकांची दमछाक उडाली. अशा परिस्थितीत काही घरांमध्ये सापाची पिल्ले आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाऊस पडला की पाणी घरांमध्ये शिरते. गेल्या दहा वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. सांडण्याचा निचरा व्हावा, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करायला हवी. केवळ चेंबरची स्वच्छता करून काय उपयोग.- टिपू बागवान, सदर बझार