शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी

By admin | Published: October 01, 2014 10:07 PM

परतीच्या पावसाने हानी : कांदा, बटाटा, सोयाबीन भिजले, घरांवरील पत्रे उडाले, दुकानांमध्ये पाणी शिरले

कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाड शहरासह तालुक्याला मंगळवारी परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ वादळी वारे, विजांचा कडकडाट व जोरदार कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मलकापूरमध्ये काही दुकानगाळ्यात पाणी शिरल्याने विक्रेते व व्यावसायिकांचे साहित्य भिजले तर जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील छत उडून गेले़कऱ्हाडला मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला़ काही ठिकाणी गारपीटही झाली़ यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़ मलकापूर येथील अशोक पाचुंदकर यांच्या मालकीच्या रेवणसिद्ध रोप वाटिकेतील दोन एकराचा झेंडू फुलांचा प्लॉट भुईसपाट झाला़ या प्लॉटमधून पाचुंदकर यांना किमान दहा टन फुलांचे उत्पादन अपेक्षित होते़ मात्र, फुलझाडे मोडून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले़ याशिवाय रोपवाटीकेतील रोपांचे वाफेही जमीनदोस्त झाले़ रोपवाटीकेचे छत मोडून पडले़ जखिणवाडी, कापिल, गोळेश्वर, चचेगाव परिसरात भाजीपाल्याचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते़ मात्र, मंगळवारी झालेल्या पावसाने दोडका, कारली यासारख्या वेलवर्गीय पिकांची हानी झाली़ मलकापूर येथील मधुकर महादेव शेलार यांच्या दोन एकर शेतजमिनीतील ऊस पीक भुईसपाट झाले आहे़ सध्या शिवारात सोयाबीन काढणीस वेग आला असून मंगळवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे़ तसेच सोयाबीन भिजल्याने त्यांचे लाखो रूपयांचे नुकसानही झाले आहे़दरम्यान, बुधवारी दुसऱ्या दिवशीही दुपारपासून तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ शहर परिसरात दुपारपासून संततधार पाऊस पडत होता़ त्यामुळे सखल भागात पाणी साचले़ मंगळवारच्या तुलनेत बुधवारी वाऱ्याचा जोर व विजांचा कडकडाट कमी असल्याने नुकसानीची घटना घडली नाही़ बुधवारी सायंकाळी खटाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. औंधसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. (प्रतिनिधी)औंध परिसराला पावसाने झोडपलेऔंधसह परिसराला बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले. तर या पावसामुळे कांदा, बटाटा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. परिसरात शेतमशागतीची तसेच पेरणीची कामे सुरू झाली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी सायंकाळी औंधसह जायगाव, भोसरे, वरुड, गोसाव्याची वाडी, पळशी, गोपूज, नांदोशी, खबालवाडी, वडी, कळंबी आदी भागाला पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गटार तुंबून पाणी रस्त्यावर पसरले़ पावसामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील गटार तुंबले़ परिणामी, शिवछावा चौकापासून जवळच असलेल्या हिंदुस्थान मार्बल हाऊस दुकानासमोर तळे साचले़ गटारचे पाणी रस्त्यावर पसरल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती़नवरात्र मंडळाच्या मंडपाचे नुकसानमलकापूरसह आगाशिवनगर परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांच्या मंडपाचे मंगळवारच्या पावसाने नुकसान झाले़ अनेक मंडळांच्या मंडपाचे छत फाटले़ तर काही मंडपांचे खांब मोडून पडले़ आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतील मंडळाचा मंडप अक्षरश: भुईसपाट झाला़ स्वागतकमानीही मोडून पडल्या़