खटाव : खटावच्या भराडे वस्तीवर पाणी टंचाई जाणवत असल्याने, पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार महेश शिंदे यांच्याकडे केली अन् केवळ तासाभरात कूपनलिका काढली गेली. वस्तीवरचा पाण्याचा प्रश्न आमदार महेश शिंदे यांनी कायमचा सोडवून टाकला.
खटावच्या भराडे वस्तीवर पाणी टंचाई जाणवत होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सकाळी आमदार शिंदे यांची भेट घेऊन, पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. त्या क्षणालाच आमदारांनी कूपनलिका खोदणारी मशीन मागवून घेतली. मशीन सुरू झाली अन् तासाभरात भराडे वस्तीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला.
यावेळी डॉ. प्रिया महेश शिंदे, राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल जमदाडे, ग्रामपंचायत सदस्या माधवी सकटे, सुरेखा पाटोळे, रमेश शिंदे, महेश पाटोळे, प्रशांत शिंदे, बबन शिंदे, हरिश्चंद्र भराडे, दत्तात्रय भराडे, संदीप लावंड, अशोक लावंड, सयाजी माने, महेश काळे उपस्थित होते.