शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Satara: कोयना धरणात पाण्याची आवक वाढली; नवजा ४१, महाबळेश्वरला ४२ मिलीमीटर पावसाची नोंद 

By नितीन काळेल | Updated: June 26, 2024 19:31 IST

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून २४ तासांत कोयना येथे ३७, नवजा ४१ आणि ...

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून २४ तासांत कोयना येथे ३७, नवजा ४१ आणि महाबळेश्वरला ४२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १६.६९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. त्यानंतर काही दिवस पूर्व तसेच पश्चिम भागात चांगले पर्जन्यमान झाले. परिणामी खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला. पण, मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह महाबळेश्वर भागातही तुरळक स्वरुपात पाऊस पडत होता. यामुळे पावसाचा जोर कधी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढत चालला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३७ मिलीमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत ५७९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत ७६५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. महाबळेश्वरलाही २४ तासांत ४२ तर जून महिन्यात आतापर्यंत ४९५ मिलीमीटर पाऊस झालेला आहे.पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांतही हळूहळू पाण्याची आवक होऊ लागली आहे. कोयना धरणातही आवक वाढत चालली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १ हजार ७२४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा १६.६९ टीएमसी झाला होता. मागील आठवड्यापासून धरणात पाणी येत असल्याने धरणसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. तर सध्या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.सातारा शहरातही मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर शहरवासियांना पावसाचा सामना करावा लागला. तर बुधवारी सकाळच्या सुमारासही रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण