शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागालाही टंचाईच्या झळा, ३ लाख लोकांची तहान भागतेय टँकरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:16 PM

६५ विहिरी, ५० विंधन विहिरी अधिग्रहित

सातारा : पावसाने ओढ दिल्यामुळे या वर्षीची पाणीटंचाई जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिम भागालाही जाणवत आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्यातही काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. कष्णा-कोयनासारख्या नद्यांचे सान्निध्य लाभलेल्या कऱ्हाड तालुक्यात ४, तर पाटण तालुक्यातही ९ आणि वाई तालुक्यात ४ टँकर सुरू आहेत. याशिवाय अनेक गावांतून टँकरची मागणी नसली तरी त्या ठिकाणी पाण्याचा ठणठणाट आहे. संपूर्ण जिल्ह्यात ४३१ टँकर सुरू आहेत.सातारा जिल्ह्यात जून २०२३ मध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा झाला. पावसाळा संपताच पूर्वेकडील भागात पाणीटंचाई भासू लागली. पश्चिमेकडील भागातही पूर्ण क्षमतेने पाऊस झाला नाही. त्यामुळे जानेवारी, डिसेंबरपासून पाणीटंचाईची चाहूल लागली. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २०७ गावे आणि ६५३ वाड्या-वस्त्यांमधील ३ लाख २२ हजार ८८१ लोकसंख्या दुष्काळामुळे बाधित झाली आहे. यामध्ये पश्चिमेकडील वाई तालुक्यातील चार गावांतील ३०१४ गावे बाधित आहेत. मांढरदेव, गुंडेवाडी, ओहळी, बालेघर गावांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त चार गावांत टँकर सुरू आहे. पाटण तालुक्यातील ७ गावांतील ४४४३ लोकसंख्या बाधित आहेत, तर ९ टँकर सुरू आहेत.धडामवाडी, पाठवडे तर वाड्यांमध्ये जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची, काढणे, शिद्रुकवाडी, चव्हाणवाडी, नाणेगाव, घोट (फडतरवाडी), आंब्रुळकरवाडी (भोसगाव), बोपोली घाटमाथा (ढाणकल), डेरवन कोळेकरवाडी या गावांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील गायकवाडवाडी, बामणवाडी, वानरवाडी, खोडजाईवाडी, घोलपवाडी, मस्करवाडी, चोरजवाडी या सात गावांतील ४९८६ लोकसंख्या दुष्काळाने बाधित आहे. तालुक्यात चार ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत.पाणीटंचाईमुळे २०६८४५ पशुधन बाधित

पाणीटंचाईमुळे नागरिकांना जशी झळ पोहोचते, त्याचप्रमाणे पशू-पक्ष्यांचा जीवही तहानेमुळे कासावीस होतो. या वर्षी जिल्ह्यातील तब्बल २,०६,८४५ पशुधन दुष्काळामुळे बाधित झाले आहे. यामध्ये सर्वाधिक पशुधन १ लाख १९ हजार ७१५ माण तालुक्यातील आहे. यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत जनावरांच्या चारा आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.६५ विहिरी, ५० विंधन विहिरी अधिग्रहित

टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ६५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ५० विंधन विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी