शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई, ७ तालुक्यांत टँकरचा धुरळा; १६ गावे, ५० वाड्या तहानल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 1:28 PM

पावसाळा सुरू होण्यास विलंब असून, कडक उन्हामुळे टंचाई वाढू लागली

सातारा : जिल्ह्यात पावसाळा सुरू होण्यास विलंब असून, कडक उन्हामुळे टंचाई वाढू लागली आहे. सध्या ७ तालुक्यातील १६ गावे आणि ५० वाड्यांसाठी १५ टँकर सुरू आहेत. सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात असून, ७ गावे आणि ४३ वाड्या तहानलेल्या आहेत. यामुळे माणमधील सुमारे १० हजार लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.जिल्ह्यात मागील काही वर्षांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी मुरत आहे. अशी कामे अधिक करून माण, खटाव, फलटण, कोरेगाव अशा दुष्काळी तालुक्यांत पाणीटंचाई तुलनेने कमी जाणवत आहे. त्यातच चार वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. यामुळे टंचाई कमी झाली आहे. यावर्षी तर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या.सद्य:स्थितीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने मागणीप्रमाणे टँकर सुरू केले आहेत. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांत ७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. माणमधील ७ गावे आणि ४३ वाड्यांत टंचाई आहे. येथील ९ हजार ३६६ लोकांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बिदाल सर्कलमधील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी गाव आणि परिसरासाठी हे टँकर सुरू आहेत. मलवडी सर्कलमध्ये वारुगड आणि म्हसवड सर्कलमधील भाटकी गावांतर्गत लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.खटाव तालुक्यात एकाच गावात टंचाई स्थिती आहे. भोसरे सर्कलमधील जायगाव येथे टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांत टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे मांढरदेव परिसरातील आहेत. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी - भोसगावला टँकर सुरू करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात १ गाव आणि एका वाडीसाठी टँकरने पणीपुरवठा केला जात आहे, तर सातारा तालुक्यात १ गाव आणि ३ वाड्या तहानल्या आहेत.

१८ हजार नागरिकांना टँकरचा आधार...कऱ्हाड तालुक्यात ४ गावांत टंचाई आहे. वानरवाडी, बामणवाडी, गोडवाडी आणि गायकवाडवाडी येथे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यावर ३ हजार १५७ ग्रामस्थ आणि १ हजार ९९५ पशुधन अवलंबून आहे. जिल्ह्यात एकूण १५ टँकर सुरू असून, यावर १८ हजार ५४० नागरिक आणि ३ हजार ५६९ पशुधन अवलंबून आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी