सागर गुजर ।सातारा : गत पावसाळ्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा होऊनही सध्याच्या घडीला सर्व धरणे रिती झाली आहे. कोयना, उरमोडी, धोम, कण्हेर या मोठ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिला असून, पाणी वाटपाचे गणित कुठेतरी फसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणांमध्ये गेल्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. आता मात्र धरणे आटण्याच्या मार्गावर आहेत. येरळवाडी, नेर, आंधळी, राणंद या तलावांत पिण्यासाठी पाणी साठवून ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असला तरी काही लोक मोटारी लावून हे पाणीही चोरत असल्याने लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयानक रूप धारण करून उभा राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीचा मोठा बाऊ केल्याने दुष्काळी उपाययोजना करताना ढिलाई झाल्याचे समोर आले आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा या सदैव दुष्काळाशी सामना करणाऱ्या तालुक्यांबरोबरच पाटण, वाई, कºहाड या तालुक्यांनाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.
कोयना धरणातून कर्नाटक, सांगलीसाठी पाणी सोडण्यात आले असल्याने कृष्णा-कोयनेत पाणी आहे. या नद्यांभोवतीच्या पाणी योजना सध्या तरी अडचणीत आलेल्या नाहीत. मात्र, कोयना धरणात अवघे १६.५१ इतके कमी पाणी शिल्लक राहिले असल्याने भविष्यात या मोठ्या नद्यांकाठची गावेही पाण्याच्या शोधात फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उरमोडी धरणातील पाणी कण्हेर कालव्यातून माण, खटाव तालुक्यांना पिण्यासाठी सोडण्यात आले. तिथल्या लोकांनाही ते पुरेसे मिळत नसल्याचे चित्र आहे. कालव्यांमध्ये तसेच तलावांमध्ये अवैधरीत्या मोटारी बसवून ते पाणी काहीजण उपसून पळवून नेत असले तरी प्रशासनाचा त्यावर अंमल नाही. महसूल, जलसंपदा आणि पोलीस या शासकीय यंत्रणा एकमेकांकडे हात दाखवत असल्याने पाणी चोरणाऱ्यांवर कोणतीच कारवाई झालेली नाही.
धोम बलकवडीचे पाणी फलटणकडे नेले असले तरी वाई, खंडाळा तालुक्यांत मात्र दुष्काळाच्या झळा पाहायला मिळत आहेत. नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पाणीदार जिल्ह्यात टंचाईच्या झळा पसरू लागल्या आहेत. एकमेकांकडे बोटे दाखवून हा प्रश्न मिटणार नाही. पाऊस पडला नाही तर अत्यंत वाईट परिस्थितीला दुष्काळग्रस्तांसारखेच पाण्याच्या छायेतील लोकांना सामोरे जावे लागणार आहे.पालकमंत्र्यांचे आमदारांकडे बोटधरणांतील पाणी कालव्यांत सोडत असताना गणित फसल्याचे पुढे येत आहे. हे पाणी नियोजनबद्धरीत्या वापरले असते तर पावसाळ्यापर्यंत ते कसेही पुरले असते. मात्र, ते कुठल्याही वेळी सोडले गेले, साहजिकच धरणांतही कमी पाणीसाठा राहिला आहे. पालकमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते आमदारांकडे बोट दाखवत आहेत. कालवा समितीमधील निर्णयानुसारच पाण्याची आवर्तने सोडली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नद्या आटल्याउरमोडी, तारळी, कुडाळी, मांड या नद्यांचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. साहजिकच या नद्यांच्या काठावर असणाºया गावांत पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे.धरणे अन् शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)धोम २.२६कण्हेर २.२९कोयना १६.५१धोम बलकवडी ०.३१च्उरमोडी १.३१च्तारळी १.९४९च्येरळवाडी ०च्नेर ०.०४१