शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

By नितीन काळेल | Published: August 16, 2024 7:17 PM

१० गावे ५६ वाड्यांत टंचाई : १८ हजार लोकांना आधार 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात अजूनही पावसाची ओढ आहे. त्यामुळे माण तालुक्यातील १० गावे आणि ५६ वाड्यावस्त्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १८ हजार लोकांची तहान सध्या या टॅंकरवरच अवलंबून आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. परिणामी नोव्हेंबर महिन्यापासूनच टॅंकरची मागणी होत होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मार्चनंतर टंचाईची स्थिती दिवसेंदिवस वाढत गेली. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची अधिक दाहकता होती. त्यानंतर फलटण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत टंचाई वाढली. मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील २१८ गावे आणि ७१६ वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर ३ लाख ३३ हजार नागरिक आणि अडीच लाखांहून अधिक पशुधन अवलंबून होते. यासाठी शासकीय आणि खासगी मिळून २०८ टॅंकर सुरू होते. मात्र, जून महिना उजाडताच पाऊस सुरू झाला.दरवर्षी जून महिन्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. यंदा ६ जून रोजीच पाऊस सुरू झाला. सुरुवातीला आठ दिवस पूर्व तसेच पश्चिम भागातही जोरदार पाऊस पडला. यामुळे टंचाईची दाहकता कमी होत गेली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टंचाई निवारणासाठी धावत असणारे टॅंकर बंद झाले. आतापर्यंत खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कऱ्हाड, सातारा तालुक्यातील टॅंकर बंद झालेत. पण, पावसाळ्याचे अडीच महिने संपून गेले तरीही माण तालुक्यातील काही गावांना टॅंकरच्याच पाण्याचा आधार आहे. अनेक गावांत चांगला पाऊस झाल्याने तेथील टंचाई संपलेली आहे. पण, सध्या १० गावे आणि ५६ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. आगामी काळात या भागात चांगला पाऊस झाल्यानंतरच तेथील टॅंकर बंद होतील.

माणमध्ये तीन मंडलात टॅंकरने पाणीपुरवठा..माण तालुक्यातील बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तेथील टॅंकर बंद झालेत. तर सध्या म्हसवड, गोंदवले बुद्रुक आणि मार्डी महसूल मंडलात टॅंकर सुरू आहेत. म्हसवड मंडलात वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी या गावांना आणि वाडीवस्तीला टॅंकरचा आधार आहे. गोंदवले मंडलात पळशी आणि जाशी येथे तर मार्डी मंडलात मार्डीसह, पर्यंती, इंजबाव आणि वाकी येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसman-acमाणWaterपाणी