शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

कासच्या गळ्याला पाणी

By admin | Published: July 04, 2016 12:06 AM

प्रतीक्षा चार फुटांची : सातारकरांची वर्षासाठी मिटणार चिंता

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव भरण्याच्या मार्गावर असून, कास भरण्यासाठी केवळ चार फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सोमवारपर्यंत कासच्या सांडव्यावरून पाणी वाहून लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सातारा शहराच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी मुसळधार पावसाने तलावात तीन फूट पाणी वाढून अकरा फुटांवर आले. शनिवारी दिवस रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत पंधरा फूट पाणी झाले. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सोमवारी कास पूर्ण क्षमतेने भरणार आहे. दरम्यान, कण्हेर धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होऊ लागली आहे. यावर्षी पावसाला काहीसा उशीर झाल्याने सातारा शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. जून संपला तरी शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरू झाली. अर्धा टीएमसी एवढी पाणी साठण्याची क्षमता असणारा कास तलाव पूर्णपणे भरला असल्याने सातारा शहराचा वर्षभर पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. शहराच्या पश्चिमेस यवतेश्वर, कास, बामणोली, परिसरात शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. झरे फुटून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहू लागले आहे. कास पठारावरून वाहणाऱ्या पाण्याने एकीव येथील धबधबे कोसळू लागले आहे. (वार्ताहर) दहा दिवस उशीर... गतवर्षी पावसाचे कमी प्रमाण, उन्हाची तीव्रता तसेच काही ठिकाणी जलवाहिनीची गळती, यामुळे कास तलावाची पाणी पातळी अगदी पाण्याच्या मृत साठ्यापर्यंत सहा फुटांवर आली होती. सातारकरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे सातारकरांवरचे पाणीटंचाईचे संकट टळले आहे. गेल्या वर्षी २२ जूनला कास तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवसांनंतर कास तलाव भरत आहे.