सातारा : लोकबिरादरी प्रकल्पाला पाठिंबा आणि योगदान देण्यासाठी डॉ. अमित समर्थ हे सायकलवरून राईड अॅक्रोस इंडिया मोहिमेवर निघाले आहेत. साताऱ्यात आल्यावर त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
डॉ. अमित समर्थ यांनी सोमवारी सकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळून पहाटे या मोहिमेला सुरुवात केली. साधारणपणे प्रति तास ३० किलोमीटर रायडिंग स्पीड धरून ते पुढे जात आहेत. साताऱ्यात सोमवारी दुपारी सव्वा दोनला त्यांचे आगमन झाले. यावेळी सातारकरांनी त्यांचे स्वागत केले. एएफएसएफ फौंडेशन आणि सातारा सायकलिंग क्लब या संस्थांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली होती.
फोटो दि.१५सातारा बायसिकल नावाने...
फोटो ओळ : सातारा येथे डॉ. अमित समर्थ यांचे स्वागत करण्यात आले.
\\\\\\\\\\\\\\\\\