शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

उदयनराजेंचे भाजपमध्ये स्वागत करू : चंद्रकांतदादा

By admin | Published: January 13, 2017 11:11 PM

उंब्रजमध्ये सूतोवाच : पक्षात आदराचे स्थान देऊ

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय जनता पक्षात मनापासून स्वागत असेल, असे सूतोवाच करतानाच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘मात्र असा प्रस्ताव अद्याप त्यांच्याकडून आलेला नाही,’ असेही स्पष्टीकरण दिले.उंब्रज येथे शुक्रवारी कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘छत्रपतींना आमचा नेहमीच मानाचा मुजरा असतो. आमच्या पक्षात उदयनराजेंना नक्कीच आदराचे स्थान मिळेल,’ असे स्पष्ट करून चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रचार करण्यासाठी भाजपने तयारी दर्शविली आहे.’शेंद्रे येथे ‘अजिंक्यतारा’च्या कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार यांनी उदयनराजेंचे नाव न घेता ‘पक्षाच्या मुळावर उठलेल्यांना बाजूला काढा!’ असा आदेश दिला होता. त्यानंतर उदयनराजेंची भूमिका काय राहणार, याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली असतानाच चंद्रकांतदादा पाटील यांचे ‘उदयनराजेंना भाजप आवतन’ भविष्यातील धक्कादायक घडामोडींची नांदी ठरू शकते. (प्रतिनिधी)