शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पश्चिमेचा चारा पूर्वेला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:36 AM

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे ...

धो-धो पाऊस पडत असलेल्या पश्चिमेकडील शेतकऱ्यांना चाऱ्याची कधी कमतरता भासली नाही. या भागातील जनावरांना चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच गुराखी पावसाळ्यात चांगले गवत उगवावे, यासाठी डोंगर पेटवून टाकत होते. त्याचवेळी पाचवीलाच दुष्काळ पूजलेल्या माण खटावमधील बळीराजा मात्र पशुधन वाचविण्यासाठी धडपड करत असायचा. हे चित्र कुठे तरी थांबले पाहिजे, या विचाराने ‘लोकमत’ने २०१३ या वर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक अनोखी चळवळ उभारली. पश्चिमेकडील डोंगरावरील चारा जाळून टाकला म्हणून काहीच हाती मिळत नाही, तो आपण कापून आपल्या जिल्ह्यातील एका भागातील दुष्काळी शेतकऱ्यांना दिला तर मुक्या जनावरांचे पोट तरी भरेल. याबाबत जनजागृती केली. सुरुवातीला यासाठी काही प्रायोजक मिळाले. हा विचार पटला आणि काहींनी स्वतःचा ट्रक दिला. काही उद्योजकांनी त्यासाठी इंधन उपलब्ध करून दिले तर अनेकांनी हे दोन्ही आमच्याकडे नाही म्हणून गवत कापण्यासाठी त्यांचा वेळ आणि श्रम खर्ची केला.

पाहता पाहता ही चळवळ लोकचळवळ बनू पाहत होती. यामध्ये जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, गणेशोत्सव मंडळे सहभागी होत होती. यासाठी आम्ही काय करू शकतो याबाबत विचारणा केली जात होती. दरम्यान, माजी खासदार दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांचा वाढदिवस आणि त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस होता. दोन्ही नेत्यांनी वाढदिवसावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चात कपात करून त्यांनी या भागातून चारा पूर्वेला पाठविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या सर्व मोहिमेत तब्बल पाचशेहून अधिक ट्रक चारा हा पूर्वेला गेला होता. पुढे याची दखल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घ्यावी लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चळवळीत गवत कापण्याचे काम करणाऱ्यांसाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मानधन कसे देता येईल याबाबत सूचना केल्या होत्या.

चौकट...

विझले वणव्याचे बोळे... हाती आले विळे

‘तुम्ही जे जाळता गवत, ते बनू शकते दुष्काळी भागातील जनावरांसाठी खाद्य’, हे पटवून दिले. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी यावर गावागावांत एकमत होऊ लागले. मग विझले गेले विस्तवाचे बोळे आणि हाती आले गवत कापण्याचे विळे! ग्रामस्थांनी श्रमदानातून कापणी सुरू केली. सुरुवातीला काही छावण्यांमध्ये हा चारा मोफत वाटला गेला तर काही गावांत थेट घरपोच दिला गेला.

चौकट

माणने अनुभवले तीन भयानक दुष्काळ

माण तालुक्यात १९७२ ला पहिला मोठा दुष्काळ पडला. तेव्हा लोकांना खायला अन्न, जनावराला चारा व हाताला काम नव्हते. २००२-२००३ च्या दुष्काळात शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या उभ्या केल्या. पहिल्यांदाच खासगी टँकरने पाणी पुरवठा केला. तर २०१२ चा दुष्काळ थोडा वेगळा ठरला. धान्याची टंचाई नव्हती. पिण्याचे पाणी उपलब्ध होते. मात्र, जनावरांना चारा नव्हता. त्यामुळे पुन्हा जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या. चारा छावण्या सुरु करताना निकष बदलले. ५०० जनावरांची अट घालण्यात आली.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२७संडे/२७चारा०१,०२