कातरखटाव : अवकाळी पावसाने उडवलेली दैना पाहून आज परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे अक्षरश: पाणावले. हातातोंडाशी आलेले उभे पीक आडवे झाल्याचा नजारा पाहून शेतकरी शून्यात हरवल्याचे दृश्य सकाळी पाहायला मिळाले. रात्रभर टिपका चालू राहिल्याने रानात पडलेली ज्वारीची कणस मातीत रुतल्याने त्याला कोंब येण्याची शेतकऱ्याला धास्ती वाटू लागली आहे. अशा अवस्थेत ज्वारीला किंमत येणार नाही. प्रतिक्ंिवटल दोन हजारांच्या ज्वारीला पाचशे रुपयाला सुध्दा कोण विचारणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.पाळीव जनावरांना आवश्यक असणारी वैरण खराब झाली आहे. एकरी सात हजारांचे नुकसान वैरणीचे झाले आहे. पावसात भिजलेली ही वैरण जनावरांना खाण्याच्या योग्य नाही, असे शेतकरी सांगतात.गहू यंदा चांगला झाला होता. एकरी दहा क्ंिवटल दराने गहू जाईल, असा कयास होता. अवकाळी पावसाने गव्हाच्या पिंकाचेही नुकसान केले आहे. हरभराही हाती लागला नाही.गावकऱ्यांचे झालेले नुकसानासाठी दाद घ्यायला येत नसल्याची तक्रार गावकरी व्यक्त करत आहेत. तलाठ्यांनी साठ टक्के आनेवारी लावली आहे. पन्नास टक्क्यांच्या आत आनेवारी पाहिजे तरच त्याचा फायदा होईल, असे शेतकरी सांगतात. (वार्ताहर)
भिजलेला चारा घेऊन आता काय करायचं?
By admin | Published: March 02, 2015 11:34 PM