सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी हेल्पनाईन नंबर सुरू करण्यात आलाय. या हेल्पलाईन नंबरवर गेल्या दोन महिन्यांपूर्वी बेड कुठे शिल्लक आहेत, याची वारंवार विचारणा होत होती. मात्र आता बेडची विचारपूस होत नाही. थकवा येतोय काय करू, खोकला सुरू आहे, अशी विचारणा करणारे फोन सर्वाधिक येऊ लागलेत.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांना बेड मिळत नव्हते. नेमके कोणत्या रुग्णालयात किती बेड आहेत, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हेल्पलाईन नंबर सुरू केला. सुरुवातीला या नंबरवर बेड कोणत्या रुग्णालयात शिल्लक आहेत, याची विचारणा होत होती. दिवसाला २०० ते ३०० फोन हेल्पलाईनवर येत होते. आता मात्र हे प्रमाण कमी झाले असले तरी आरोग्याच्या तक्रारीबाबत विचारणा करणारे फोन वाढले आहेत. कोणी म्हणतेय खोकला येतोय, कोण म्हणतेय खूपच थकवा येतोय, काय करू, असे प्रश्न विचारत आहेत.
सातारा, कऱ्हाडमधून सर्वाधिक काॅल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबरवर सर्वाधिक काॅल सातारा शहर आणि कऱ्हाड शहरातून केले गेले असल्याचे समोर आले आहे. सातारा शहरातून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि साधे बेड मिळण्यासाठी विचारणा झाली तर कऱ्हाडमधूनही याच कारणासाठी विचारणा करण्यात आली. सध्या मात्र, वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले विचारणारे फोन हेल्पलाईनवर येऊ लागलेत. यात सर्वाधिक आरोग्याच्या तक्रारी असल्याचे हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
डोकेदुखी वाढलीय, काय करू?
n हेल्पलाईनवर अनेकजण डोकेदुखी वाढलीय, काय करू, असे प्रश्न विचारून हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांना सतावत आहेत.
nहेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांकडूनही शांतपणे त्यांना उत्तरे दिली जात आहेत. त्यांचे समुदपदेशनही करण्याचा प्रयत्न हे कर्मचारी करत आहेत.
nज्या रुग्णांना जास्त त्रास होत आहे, अशा रुग्णांना हेल्पलाईनचे कर्मचारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. रोज येणारे फोन घेऊन कर्मचाऱ्यांची अक्षरश: नाकेनऊ आले आहे.