सातारा : धरणाशेजारी असलेली अतिक्रमणे हा गंभीर विषय आहे. आमच्याही गोळीबार मैदानानजिक खाणी होत्या. त्या ठिकाणी वस्ती वाढल्यानंतर आम्ही स्वत:हून त्या बंद केल्या. आम्हाला जे नियम लागू हाेतात, ते सर्वाना लागू व्हावेत. त्यामुळे अशा कारवाईबाबत कोणी अपवाद राहता कामा नये. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, जिल्हा बँकेला ईडीचे पत्र आले. त्यात काय टॉप सिक्रेट आह काय, माहिती विचारली तरी देत नाहीत. असा आरोपही त्यांनी केला.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचाचा तसेच सातारा शहरतील वाहतूक तसेच अतिक्रमणांच्या अनुषंगाने खासदार उदयनराज भोसले यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून बैठकीबाबत माहिती दिली. ९यावेळी पत्रकारांनी येत्या काळात काही राजकीय भूकंप होणार का याबाबत विचारले असता याबाबत ज्या बैठका, खलबते झाली त्यावेळी नव्हतो, असे सांगत त्यांनी या विषयाला बगल दिली.