शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

तरूण मतदारांना खूश करण्यासाठी काय पण..!

By admin | Published: September 01, 2014 10:38 PM

माण-खटाव-कोरेगाव : मंडळांना वर्गणी भरभरून; पण लपून छपून

सातारा : गणेशोत्सवाने यंदाच्या वर्षी नेत्यांना सुखावले आहे. आचारसंहिता लागल्याची शक्यता असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी हात आखडता घेत बाप्पांच्या वर्गणी आणि देणगीला चाप लावला आहे. या उलट परिस्थिती माण, खटाव आणि कोरेगावमध्ये पहायला मिळते. तेथे लपून छपून मोठ्या प्रमाणात दमदार आकड्याची वर्गणी मंडळाकडे पोहोच केली जात आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठापनेपूर्वी आचारसंहिता लागली असती तर त्याचा निश्चित आर्थिक फायदा मंडळांना झाला असता. इच्छुक उमेदवारांच्यात बाप्पांची भक्ती उफाळून आल्याने मंडळांचा खर्च भागला असता, अशी हवा होती. मात्र आचारसंहिता लांबणीवर पडल्यामुळे ही हवा पुरती निघाली आहे.गणेशोत्सवाचा फायदा झाला आहे तो माण खटाव आणि कोरेगाव परिसरातील मंडळांना. मंडळांच्या तोंडाला येईल ती वस्तू देण्याची चढाओढ जणू येथील उमेदवारांच्यात लागली आहे. कोणी डॉल्बी तर कोणी झांज पथकाचा खर्च, कोणी प्रासादिक पुजेचा खर्च उचलतोय तर कोणाला नाव न सांगता केवळ पैसे देण्यात अधिक रस आहे.बाप्पांच्या भक्तीत सर्वचजण मग्न आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीमुळे भक्तिमय वातावरणही चांगलेच तापले आहे. कोण मोठा भक्त याची चढाओढ लागल्यामुळे याचा थेट लाभ गणेशोत्सव मंडळांना होत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण काहीही असो नेत्यांच्या खिशातून कधी नव्हे इतकी वर्गणी येत असल्याचे पाहून सर्वचजण सुखावले आहेत. (प्रतिनिधी)कोणाला मिळतेय भरघोस वर्गणी?ज्या मंडळांमध्ये मोठया प्रमाणावर भक्तांची गर्दी असते शक्यतो अशाच मंडळांना मोठ्या रकमेची वर्गणी दिली जाते. त्या त्या परिसरातील खूप वर्षांची परंपरा असणाऱ्या मंडळांचाही यात समावेश आहे. युवांची ऊर्जा निवडणुकीत खूप उपयोगाला येते. हे लक्षात ठेवून काहीदा युवकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मंडळालाही भरघोस मदत केली जात असल्याचे चित्र दिसते. या युवकांचा पुढे निवडणुकीत योग्य उपयोग करून घेण्यासाठी ही मदत केली जाते. त्याबरोबरच व्यापारी एकत्र येतील अशा मंडळांनाही भरीव मदत केली जाते. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग मिळतो. पाच हजार ते पन्नास हजार....!निवडणुकीच्या तोंडावर कोणालाही नाराज करायचे नाही, हे तत्व उराशी बाळगून नेते मंडळींनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांसह मातब्बर उमेदवारांनीही येईल त्याला वर्गणी दिली गेल्याची जोरदार चर्चा आहे. नवख्या आणि अपरिचित अशा गणेशोत्सव मंडळांना कमीत कमी पाच हजार रूपयांची वर्गणी दिली जात आहे. आपल्या परिचयाचे, आपल्या कार्यकर्त्यांची मंडळे असतील तर पाच आकडी वर्गणी निश्चितच असते. माण, खटाव आणि कोरेगाव या भागातील काही मंडळांनी तर या नेत्यांकडे चक्क मोठ मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता नेत्यांची त्रेधा उडत आहे. पण मतदारांना खूष करण्यासाठी काय पण हे तत्व सर्वत्र दिसत आहे.नेत्यांसाठी जबाबदारीबहुतांश मंडळे रोख रक्कम घेण्यापेक्षा नेत्यांना उत्सव काळात विशिष्ट जबाबदारी देत असल्याचे चित्र दिसते. १. विसर्जन मिरवणुकीची सुपारी२. बेंजो पार्टीचे पैसे३. ढोल-लेझीम यांची सुपारी४. पत्र्याची पेटी५. प्रासादिक पूजेचा खर्च६. डॉल्बीचा खर्च७. मूर्तीचा खर्च८. मंडळाच्या नावाचे टी-शर्ट बनियन तयार करून घेणे९. देखाव्यासाठी लागणारा खर्च करणे१०. अन्य खर्चासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणे