शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बिचाऱ्या व्यापाºयांचा काय दोष होता? दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसान : व्यावसायिक आता विमा कंपन्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:27 PM

सातारा शहरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील राजपुरोहित स्वीट्स व महामार्गालगतचे कणसे होंडा या शोरूमच्या

ठळक मुद्दे बिचाऱ्या व्यापाºयांचा काय दोष होता? दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसान : व्यावसायिक आता विमा कंपन्यांच्या दारात

सागर गुजर।सातारा : सातारा शहरात बुधवारी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये दुकानांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील राजपुरोहित स्वीट्स व महामार्गालगतचे कणसे होंडा या शोरूमच्या काचा आंदोलकांनी फोडल्याने या काचांचा चुराडा पाहायला मिळत होता.

या दगडफेकीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी याबाबत पंचनामा करून तोडफोड करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. येथील राजपुरोहित स्वीट्सचे कन्हैय्यालाल राजपुरोहित सांगत होते. मोर्चामुळे दुकान बंदच ठेवण्यात आले होते. परंतु या दुकानाच्या वरच्या बाजूला आकर्षक काचा आहेत, त्यावरच दगडफेक झाली. त्यातून काचा फुटून मोठे नुकसान झाले. पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले आहेत. आमच्या दुकानाचा विमा असल्याने नुकसानीची फार झळ बसणार नाही.

बॉम्बे रेस्टॉरंटपासून जवळच असणारे कणसे होंडा हे शोरूमही आंदोलकांनी लक्ष्य केले. हे शोरूम बंद होते. दुकानाचे दार काचेचे आहे. वरच्या बाजूला लोखंडी शटरही नाही. काही आंदोलकांनी या शोरूमच्या बाहेरून या काचेवर दगड फेकले. यात दुकानाची काच पूर्णत: फुटली. गुरुवारी शोरूम उघडण्यात आले. व्यवहार पूर्ववत सुरू झाले; पण दुकानाबाहेर काचांचा खच मोठ्या प्रमाणावर पडला होता.दरम्यान, आंदोलन सुरू असताना या शोरूमच्या पुढे पोलीस येऊन थांबली होते. या व्हॅनमधील काही महिला पोलीस शोरूमसमोर थांबल्या असताना आंदोलकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. हे दगड थेट काचेच्या दारावर जाऊन आदळले. 

आंदोलनामुळे शोरूम बंद ठेवण्यात आले होते. मी स्वत: मराठा मोर्चाचा समन्वयक असल्याने मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभा होतो. त्याचवेळी शोरूमच्या काचा फुटल्याची माहिती मिळाली. लाखभर रुपयांचे नुकसान झाले; पण याचा विमा असल्याने आर्थिक झळ बसणार नाही.- आनंदराव कणसे, होंडा शोरूमआमच्या स्वीट मार्टच्या काचा फुटल्या आहेत. गेटलाईटसही फुटल्या. जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. विमा असल्याने हे नुकसान भरून निघेल.- कन्हैय्यालाल राजपुरोहित

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप