शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

चाक खड्ड्यात; दणका मणक्यात!

By admin | Published: July 12, 2016 11:36 PM

सातारा मध्यवर्ती बसस्थानक : खड्ड्यातील पाण्यात एसटी पाहतेय स्वत:चे प्रतिबिंब

जावेद खान --सातारासातारा : ‘चला... सातारा आलंय, कोण उतरणार आहे का?’ असे सांगण्याची वेळ एसटी वाहकांवर येत होती. आता मात्र काळ बदलला आहे. बाहेरगावाहून एसटी बसस्थानकात आल्यावर त्यांना साताऱ्यात आल्याचे सांगण्याची गरजच भासत नाही. भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये चाक गेल्यावर मणक्यात दणका बसतो अन् सातारा आल्याची चाहूल लागते.जिल्ह्यात बारा दिवसांपासून पावसाची संततधार वाढायला लागली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठत आहे. याचा फटका रस्त्यांना बसला असून, ठिकठिकाणी खड्डे पडायला लागले आहे. याचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसायला लागला आहे.पुणे-कोल्हापूर मार्गावर सातारा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज शेकडो एसटी बसेसची वर्दळ असते. या बसस्थानकात मोठा ताण असल्याने याच्या डागडुजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.प्रवाशांना डोकेदुखीप्रवासी पहाटे साखर झोपेत असताना इनगेटमध्ये गाडीने प्रवास केल्यानंतर मोठा हादरा बसतो. यामुळे मणक्याला दणका बसल्याने अनेकांना पाठदुखीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. चालक-वाहकांचेही आरोग्य धोक्यात येत आहे.माणच्या राजकारणाला मानापमानाचा रंग!राष्ट्रवादीतील बेबनाव : सुभाष नरळे अध्यक्षपदी विराजमान होताच शिवाजीराव शिंदेंच्या अविश्वास ठरावाची खेळीसातारा : राष्ट्रवादीच्या संपूर्ण देशातील एकमेव असणाऱ्या सातारा जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यात पक्षांतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदाचा बहुमान सुभाष नरळे यांच्या रूपाने माण तालुक्याला देऊन राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केल्याचे वातावरण तयार झाले असतानाच कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वास ठरावाचा ‘वार’ करण्यात आला आहे. हा वार जिव्हारी लागल्याने शिवाजीराव शिंदे संतापाने पेटले आहेत. त्यांनी पक्षाच्या या धोरणाला कडाडून विरोधही केला आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे विश्वासू माणिकराव सोनवलकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कुणाची वर्णी लागणार? याची जोरदार चर्चा होती. माण-खटाव तालुक्यांतील राष्ट्रवादीला आलेली राजकीय अवकळा दूर करण्यासाठी रामराजे माण तालुक्याला राष्ट्रवादीतर्फे अध्यक्षपदाची संधी देणार, असे स्पष्ट होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्याला अध्यक्षपद देऊन पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. साहजिकच इतर तालुक्यांतील इच्छुक उमेदवारांची नावे बाजूला पडून माण तालुक्यातीलच एका जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपदावर संधी मिळणार हे स्पष्ट झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानामध्ये सोमवारी सकाळी रामराजे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष निवडीची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष कुणाला करायचे, याची चर्चा झाली. रामराजेंनी नरळे यांचे नाव जाहीर केले. लोणंदचे आनंदराव शेळके-पाटील यांचे नाव मागे पडले. अध्यक्षपदासाठी नरळे बिनविरोध निवडले गेले. मात्र, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता या निवडीची सभा झाली, तेव्हा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात एक कागद फिरत होता. प्रथमदर्शनी अध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादीने बजावलेल्या व्हीपवर सह्या घेतल्या जात आहेत, हे चित्र दिसले तरी त्यामागे बरेचसे राजकारण दडले होते. या कागदावर सह्या करत असताना अनेक सदस्यांनी त्यावर शंका उपस्थित केली; परंतु व्हीप असल्याचे वातावरण तयार झाल्याने अनेक सदस्यांनी त्यावर सह्या केल्या. अध्यक्ष निवडीनंतर सर्वांच्या वतीने सुभाष नरळे यांचा सत्कारही करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात कृषी सभापती शिवाजीराव शिंदे हेही सहभागी झाले होते. याच वातावरणात शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव करण्याचे काम सुरू होते. याची सूतराम कल्पना ना शिंदेंना होती... ना या ठरावावर सह्या करणाऱ्या बहुतांश सदस्यांना! सदस्यांना अंधारात ठेवून राष्ट्रवादीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या काय?, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला हा चोरी-छुपकेचा मामला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय रंग दाखवेल, हे येत्या काळातच समोर येऊ शकणार आहे.कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना राष्ट्रवादीतर्फे राजीनामा मागितला होता, कोऱ्या कागदावर सही घेऊन चुकीच्या पद्धतीने राजीनामा घेण्यात आल्याची तक्रार शिंदे यांनी केली होती. या चुकीच्या पद्धतीविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्याने ते पदावर राहिले. आता पुन्हा गुण्यागोविंदाने शिंदे यांचा ‘प्रपंच’ सुरू असतानाच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा डाव टाकण्यात आला आहे. (प्रतिनिधी)