शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कधी येणार कायद्याचे राज्य ?

By admin | Published: June 14, 2015 11:52 PM

वाठार भागात चिंता : नव्या पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षा

वाठारस्टेशन : अवैध धंद्यांचे माहेरघर बनलेल्या वाठार पोलीस ठाणे परिसरात खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री, जुगार, वडाप वाहतुकीला कायमस्वरूपी आळा घालण्यात आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला यश मिळाले नाही. आता नव्याने या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याकडून या भागातील सर्वसामान्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या अपेक्षा हे अधिकारी पूर्ण करणार की ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणेच कामकाज चालणार याविषयी चर्चेला उधाण आले आहे. वाठार पोलीसठाणे परिसरात एकूण ४७ गावांचा समावेश असून, २ सहायक पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्यासाठी मंजूर आहेत. या शिवाय या पोलीस ठाण्याअंतर्गत आदर्की फाटा येथे पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. ही चौकी सध्या मद्यपींचे आश्रयस्थान बनली आहे. कित्येक दिवसांत या चौकीचे दरवाजेच उघडले नसल्याने ती केवळ नावापूरतीच अस्तित्वात आहे. अवैध व्यवसायामध्ये देऊर, अंबवडे (सं), वाघोली, पिंपोडे बुद्रुक, सोळशी, वाठारस्टेशन, भाडले खोऱ्यात खुलेआम अवैध दारूविक्री ही या भागाची नित्याचीच बाब आहे. आजपर्यंतच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून या भागातील व्यावसायिकांना अप्रत्यक्षपणे पाठबळ देण्याचेच काम सुरू होते. दिवसेंदिवस खुनासारखे गंभीर गुन्हे या भागात घडू लागल्याने रात्रगस्त बंद असल्याने छोट्या-मोठ्या चोऱ्यांचेही प्रमाण अलीकडे वाढले आहे. वाठार बसस्थानक परिसरात बसेसपेक्षा खासगी वडापचेच प्रमाण अधिक आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने बाजारादिवशी पाकीटमारीचे प्रकारही घडत आहेत.यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सवयी मोडण्याची भूमिका घेऊन नवा कायदा अंमलात आणावा, हीच या सर्वसामान्य ग्रामस्थांची पोलिसांकडून अपेक्षा आहे. (वार्ताहर)