शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

...तेव्हा खासदारांची मर्दुमकी कुठे गेली होती?

By admin | Published: March 15, 2017 10:51 PM

शिवेंद्रसिंहराजे : अंगलट आले की मुद्दा सोडून गुद्याची भाषा

सातारा : ‘अजिंक्य उद्योग समूहाबाबत खोटेनाटे आरोप करायचे आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची, ही खासदारांची जुनी सवय आहे. अधिवेशनाला गैरहजर राहणारे खासदार म्हणून उदयनराजेंना माध्यमांनीच गौरवले आहे. असे असताना सातबारा कोरा करण्याच्या मुद्द्याला अधिवेशनाचे कारण पुढे करून खासदार बगल देत आहेत. अंगलट येऊ लागले की नेहमीप्रमाणे मुद्दे सोडून गुद्याची भाषा खासदार साहेब करत आहेत. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. पेपरबाजीतून वेळ आणि ठिकाण विचारणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कुठे गेली होती? आखिर, उदयनराजें को इतना गुस्सा क्यों आता है,’ असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘पेपरबाजी, पत्रकबाजीची हौस तुम्हालाच आहे. मताधिक्य, मताधिक्य म्हणून स्वत: जिल्ह्याचे नेते असा गोड गैरसमज बाळगणाऱ्या उदयनराजेंना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पराभव चाखावा लागला. खासदारकीच्या मताधिक्याचा एवढा अभिमान होता तर, जिल्ह्यात सोडाच सातारा तालुक्यातही सातारा विकास आघाडीला उमेदवार का मिळाले नाहीत? सातारा आणि जावळीतील जनतेने माझ्यावर आणि राष्ट्रवादी पक्षावर विश्वास दाखवून तुमचे मनसुबे धुळीस मिळवले. त्यामुळेच तुमची तळपायाची आग मस्तकात जात आहे. जनताच माझा पक्ष अशी घोकमपट्टी करणाऱ्या खासदारांचे जनतेबद्दलचे बेडगी प्रेम उघड झाल्याने बेताल वक्तव्ये सुरू आहेत. तुम्ही बोलला की मी तुम्ही केलेल्या आरोपांबद्दलची वस्तुस्थिती परखडपणे जनतेसमोर मांडणारच. यापुढे कोणत्याही बाबतीत तुम्हाला सुटी मिळणार नाही. पराभव पचवता येत नाही म्हणून भडक वक्तव्ये करायची, हे कदापि चालू देणार नाही. ‘आपण अधिवेशनाला हजर असता का नाही हे माध्यमांनी वारंवार सिद्ध केले आहे. आता माझ्या सांगण्यावरून तर माध्यमांमध्ये बातम्या छापत नाहीत. त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी अधिवेशनाचे कारण कशाला पुढे करता? एक घाव दोन तुकडे नाही, एक घाव चार तुकडे करा; पण ते जरा लवकर करा आणि शेतकऱ्यांना कायमचा दिलासा द्या.पोकळ बडबड करण्यात वेळ कशाला वाया घालवता,’ अशा शब्दात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या शेतकऱ्यांबद्दलच्या बेगडी प्रेमाचा समाचार घेतला. ‘मनोमिलन आहे का तुटले याबाबत जो माणूस ज्येष्ठांसमोर तोंडावर सांगू शकत नाही, पाच मिनिटांत परत येतो, असे सांगून बैठकीतून पळ काढतो, यालाच मर्दुमकी म्हणणार का? काही दिवसांपूर्वीच सातारा नगरपालिका कार्यालयासमोर खासदारांच्या समोर मी एकटा उभा होतो. वेळ, ठिकाण सांगा अशी तोंडाची हवा करणाऱ्या खासदारांची मर्दुमकी त्यावेळी कोठे दडून बसली होती? असा सवालही शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)...त्यामुळेच तुमचा राजकीय पुनर्जन्म झालाखासदारकीच्या आधी तुमचे अस्तित्व काय होते, हे सर्वश्रूत आहे. भाजपाच्या तिकिटावर आमदार झाला आणि तुमच्या कर्तृत्वामुळेच केवळ एक-दोन वर्षापुरते पदावर राहिलात. त्यानंतर पराभवच तुमच्या पाचवीला पुजला होता. पराभवापाठोपाठ पराभव पदरी पडल्याने तुम्ही अस्तित्वहीन झाला होता. मात्र, घराण्यातील ज्येष्ठांनी मनोमिलन घडवून आणले, त्यामुळे तुमचा राजकीय पुनर्जन्म झाला, ही वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदारकी, जिल्हा बँकेचे संचालकपद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीमध्ये तुम्हाला स्थान दिले. हे फक्त मी तुमच्या बरोबर होतो म्हणून मिळाले. त्यामुळे जास्त फुशारक्या मारू नका.खासदारकी तालुक्यापुरतीच मर्यादित‘खासदारकीच्या मताधिक्यावरून आमदारकीचे आखाडे बांधणाऱ्या उदयनराजेंना एवढी घमेंड होती तर, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राजधानी जिल्हा विकास आघाडीची सत्ता का आणता आली नाही? त्यामुळे आमच्या आमदारकीची चिंता सोडा. तुमचे मताधिक्य आणि खासदारकी सातारा तालुक्यापुरतीच मर्यादित राहिली आणि तुमची कुवत काय हे जनतेला कळून चुकले. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीतही तुमचे अस्तित्व काय हे तुम्हाला दिसेल,’ असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. वेळ न दवडता फायलींचे गाठोडे उघड करा...‘तुमचं पक्षातील स्थान, वलय याबद्दल मला कोणताही प्रश्न नाही आणि कोडही पडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी तुमचे स्थान काय हे दाखवून दिले आहेच. यापूर्वीही उदयनराजेंनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून फायली उघड करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. तेव्हाही मी ज्या काही फायली असतील त्या योग्य ठिकाणी उघड करा, योग्य ती कार्यवाही माझ्यावर होईल, असे सांगितले होते. तुम्हाला कोणी अडवले आहे? अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यामुळे खासदारांनी वेळ न दवडता फायलींचे जे काही गाठोडे असेल ते उघड करावे,’ असेही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.