संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिथं ‘रिस्क’ तिथं खाकीची ‘एन्ट्री’ फिक्स. मात्र, या ‘एन्ट्री’साठी असलेल्या सवारीचं सारथ्य करायचं म्हणजे जोखमीचं काम. या कामाला पुरुष पोलिसही धजावत नाहीत; पण कºहाडात गीतांजली यांनी हे जोखमीचं काम पत्करलय. पोलिस वाहनांवर ती चालक म्हणून तब्बल चोवीस तास काम करतेय.गीतांजली दिलीप देशमुख. कोयनानगरच्या देशमुखवाडीत शाळा शिकून पोलिस भरती झालेली ही शेतकरी कुटुंबातील युवती. गीतांजली २६ एप्रिल २०१० रोजी पोलिस दलात भरती झाली. सुरुवातीला ती साताºयाच्या मुख्यालयात नेमणुकीस होती. सहा वर्षे त्याठिकाणी तिने कर्तव्य बजावले. त्यानंतर २०१६ मध्ये ती कºहाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली. येथे एक वर्ष ती कार्यरत होती. त्यानंतर तिला तिच्या आवडत्या विभागात काम करण्याची संधी मिळाली.‘ड्रायव्हींग’ हे गीतांजलीचं आवडतं काम. ती आठवीत असल्यापासून वाहनांच्या सानिध्यात होती. इतर मुलींप्रमाणे गीतांजलीनं शिकावं, मोठ व्हावं, ही तिच्याही कुटुंबीयांची अपेक्षा; पण या अपेक्षेबरोबरच तीनं कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, असाही तिच्या कुटुंबीयांचा अट्टाहास. कुटुंबीयांच्या या पाठबाळामुळेच गीतांजली वाहनांकडे आकर्षित झाली. दुचाकी चालविण्यापासूून तिच्या ‘ड्रायव्हींग स्किल’ला सुरुवात झाली. त्यानंतर चारचाकी, जीप, टेम्पो, ट्रक अशी अनेक वाहने चालविण्याचे तिने धाडस केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच चालक म्हणून ती खºया अर्थाने सर्वांसमोर आली; पण पोलिस दलात रुजू झाल्यानंतर तिच्या या आवडत्या कामाला काही प्रमाणात का होईना खंड पडला. गार्ड ड्यूटी, आरोपी पार्टी, रोटेशन आणि बंदोबस्त या कामात गीतांजली अडकली. मात्र, २०१६ मध्ये कºहाड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना तिने पोलिस दलाच्या मोटार वाहन विभागात जाण्याची तयारी दर्शवली. वरिष्ठ अधिकाºयांनीही तिला त्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर गीतांजलीने मोटार वाहन विभागातून प्रशिक्षण घेतले. मोटार वाहन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे तिला सहकार्य केले. त्यामुळे ती पोलिस वाहने चालविण्यासाठी सज्ज झाली. कºहाड शहर प्ठाण्यात गीतांजली सध्या चालक म्हणून कर्तव्य बजावत आहे.डोळ्यात कुतूहल...पोलिस वाहनांवर पुरुष चालक पाहण्याची सवय लागलेल्या डोळ्यांना ‘स्टेअरींग’वर महिला चालकाचा हात पाहून आश्चर्य वाटतं. गीतांजली पोलिस वाहन घेऊन जात असताना अनेकजण कुतूहलानं पाहतात. ‘हे कुतूहल फक्त पाहण्यापूरते मर्यादित न राहता एकाने जरी त्यांच्या मुलीला चालक बनवलं तर माझं काम सार्थक झालं,’ असं गीतांजली सांगते.
जिथं-जिथं ‘रिस्क’ तिथं गीतांजलींची एन्ट्री ‘फिक्स’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:21 PM