महाबळेश्वर : येथील तहसीलदार कार्यालयाच्या शेजारील भूमिअभिलेख कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिकांना पांढऱ्या रंगांचा असलेला शेकरू प्रथमच या भागात दिसला. राज्य प्राणी शेकरु अर्थातच शेकरा [ Indian giant squirrel – Ratufa indica ] या नावाने परिचीत असलेला खार म्हटली की इटुकली पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपुट इकडे तिकडे उडवत तुरुतुरू पळणारा प्राणी आपल्या नजरेसमोर येतो, पण शेकरु मात्र खारीच्या या वर्णनाच्या अगदी उलट आहे, असे म्हणावे लागेल. शेपटीसकट साधारण तीन ते साडेतीन फूट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे.
तहसीलदार कार्यालयानजीक नरक्याच्या झाडावर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे दुर्मीळ शेकरू शुक्रवारी सकाळी पाहावयास मिळाले. शेकरुची पाठ तपकिरी, पिवळसर, पांढरा गळा, छाती, पोट, तोंडावर रुबाबदार लांब मिशा,लांब सुळ्यासारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असतात; मात्र या पांढऱ्या रंगाच्या शेकरुंचे डोळे गुलाबीसर तर संपूर्ण पांढरे असल्याचे दिसून आले. येथील एमटीडीसीमध्येदेखील अशाच प्रकारचे एक शेकरू पाहावयास मिळाले होते. इंग्रजीमध्ये शेकरूस ''इंडियन जायंट स्क्विरल' नावाने ओळखला जातो येथील एमटीडीसीमध्येदेखील अशा प्रकारचे एक पांढरे शेकरू दिसून आले होते.