शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

पांढऱ्या शुभ्र दुधाचा रस्त्यावर सडा ! सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात पावणेबारा टक्के संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:45 PM

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवारी एकूण संकलित होणाºया २३ लाख ५८ हजार ४०० लिटर दुधापैकी अवघे १ लाख ८२ हजार १०० लिटर दुधाचे संकलन झाले. एकूण दूध संकलनाच्या ११.७५ टक्के इतके अत्यल्प दूध संकलन झाले. संपूर्ण जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकºयांनी दरवाढीची अपेक्षा धरत आंदोलनाला प्रतिसाद दिला.दुधाला प्रति लिटर ...

सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे सोमवारी एकूण संकलित होणाºया २३ लाख ५८ हजार ४०० लिटर दुधापैकी अवघे १ लाख ८२ हजार १०० लिटर दुधाचे संकलन झाले. एकूण दूध संकलनाच्या ११.७५ टक्के इतके अत्यल्प दूध संकलन झाले. संपूर्ण जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकºयांनी दरवाढीची अपेक्षा धरत आंदोलनाला प्रतिसाद दिला.दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्यावे व ते अनुदान शेतकºयांच्या थेट खात्यावर जमा करण्यात यावे, ही मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे. सोमवारी आंदोलनाचा पहिला दिवस होता. या आंदोलनाचा धसका घेत दूध संघांनीही दूध संकलन बंद ठेवले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत दूध वितरित करण्यात आले. कºहाडात झोपडपट्ट्यांमध्ये दूध वाटण्यात आले.सातारा तालुक्यातील शिवथर, जावळेवाडी, नेले, वनगळ या गावांत दूध उत्पादक शेतकºयांनी महादेवाच्या मंदिरांत पिंडींना दुग्धाभिषेक घातला. आंदोलनाच्या निमित्ताने शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत दूध मिळाल्याने मुलेही खूश दिसत होती. दरम्यान, रोज दूध वितरण करणाºयांनी आपल्या ग्राहकांना आदल्या दिवशीच ज्यादा दूध घ्यायला सांगितले होते, त्यामुळे ग्राहकांची सोमवारी गैरसोय झाली नाही. मात्र, मंगळवारपासून दूध मिळण्याची शक्यता नसल्याने घरा-घरांत चिंता पाहायला मिळत आहे.दरम्यान, जिल्ह्यामध्ये शासकीय दूध संघातर्फे ४ हजार ६०० लिटर, सहकारी दूध संघांच्या माध्यमातून १ लाख ७०० लिटर, मल्टिस्टेट संघांकडून १ लाख ६९ हजार ५०० लिटर, खासगी प्रकल्पांद्वारे २० लाख ८३ हजार ६०० लिटर इतके दूध संकलित केले जाते. यापैकी अवघे १ लाख ८२ हजार १०० लिटर दुधाचे सोमवारी संकलन झाले. मंगळवारी दूध पुरवठा बंद राहिल्यास मोठी कोंडी होणार आहे.म्हासुर्णेच्या भैरवनाथाला १०० लिटर दुधाचा अभिषेकपुसेसावळी : खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील शेतकºयांनी एक लिटर दुधाला पाच रुपये अनुदानासंदर्भात केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बेमुदत दूध बंद आंदोलनास पाठिंबा म्हणून ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या चरणी शंभर लिटरचा दुग्धाभिषेक घातला आणि दुधाचा भाव वाढलाच पाहिजे, अशा घोषणा देत गावातील चौकातून फेरी काढण्यात आली.त्याचबरोबर गावातील दूध शंभर ते दीडशे लिटर दुधाचे वाटप जयराम स्वामी दिंडीला करण्यात आले. या गावातील दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. यावेळी दादासो कदम, तुळशीराम माने, नामदेव माने, दादासो माने, आरबाज मुलाणी, अजित माने, धुळदेव घागरे, संदीप चव्हाण, अमृत माने, दीपक मोरे, संतोष सरकाळे, सचिन माने आदी शेतकºयांनी आंदोलनास पाठिंबा दिला.शेतकºयांकडून गरिबांना दुधाचे वाटपपाचवड : वाई तालुक्यातील भुर्इंज, पाचवड, आसले, उडतारे व चिंधवली गावांमधील सर्व दूध संकलन केंद्रांनी व शेतकºयांनी सोमवारी सकाळी दूध संकलन पूर्णपणे बंद ठेवून दूध दरवाढ आंदोलनात सहभाग नोंदवला.दरम्यान, संकलन न करण्यात आलेले दूध शेतकºयांनी काही ठिकाणी गोर-गरिबांना वाटले. तसेच काही गावांमध्ये ग्रामदेवतेला अभिषेक घालण्यात आला. पाचवडमध्ये शेतकºयांनी संकलित केलेले दूध आटवून ते ग्रामस्थांमध्ये वाटण्यात आले.४काही महिन्यांपासून दुधाचे दर हे कमी झाले आहेत. दूध दर कमी झाला असला तरी पशुखाद्यांच्या दरामध्ये मात्र भरमसाठ वाढ झालेली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर १६ जुलैपासून शहराकडे जाणारा दूध पुरवठा रोखण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत करण्यात आले होते. या आवाहनात्मक निवेदनाच्या प्रती परिसरातील सर्व दूध संकलन केंद्रांना वितरित करण्यात आल्या होत्या. या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत भुर्इंज, पाचवड, आसले, उडतारे, चिंधवली व आसपासच्या अनेक गावांमधील संकलन केंद्रांनी व शेतकºयांनी दूध संकलन बंद ठेवले. जोपर्यंत दूध दरवाढ मिळत नाही, तोपर्यंत दूध बाहेर पाठवणार नाही, असा सर्व शेतकºयांनी व संकलन केंद्रांनी निर्धारही केला.