पाचगणी : वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू आहे. त्यामुळे पडलेल्या भिंतीला मुहूर्तच मिळाला नाही. अशा पडक्या शाळेत मुले शिक्षणाचे शिक्षणाचे धडे घेत आहेत. ग्रामपंचायतीचे मात्र दुर्लक्ष होत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये वालूथ जिल्हा परिषद शाळेची भिंत पडली. या घटनेस पाच महिने होऊन गेले आहेत. तरीसुद्धा भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. शाळेची इमारत जिल्हा परिषदेची नाही, ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे आज पाच महिने होऊनसुद्धा पडलेल्या भिंतीची दुरुस्ती केली जात नाही. गेल्यावर्षी शाळेच्या आवारातील सुरंक्षण भिंत पडली. त्यास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे. ही भिंत याच अवस्थेत आहे.शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.
अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडून तडे गेले आहेत. या पडक्या इमारतीमध्येच मुले ज्ञानार्जन करीत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीने पडलेल्या भिंत दुरुस्त करावी, असा ठराव करून शाळेच्या मुख्याध्यापकांना दिला होता. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाने दुरुस्तीचा निर्लेखन प्रस्ताव तयार करून शिक्षण विभाग पंचायत समिती जावळी यांच्याकडे सादर केला आहे; परंतु शाळा इमारत जिल्हा परिषदेची नसून ती ग्रामपंचायतीची असल्याने तिची दुरुस्ती ग्रामपंचायतीनेच करायची असते, असे सांगण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मात्र शाळा इमारत आपल्या मालकीची आहे. यापासून अज्ञाभीत आहे. हीच मोठी शोकांतिका आहे. शासन शाळा डिजिटल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चौदाव्या वित्त आयोगातून निधी दिला जात आहे.अनेक ठिकाणी लोकसहभागातून शाळा डिजिटल झाल्या आहेत. वालूथ ग्रामपंचायत स्वत:च्याच शालेय इमारतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
सरपंचांना माहित नाही शाळा कोणाचीजुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे वालुथ येथील शाळेची भिंती त्या काळात पडली. त्यानंतर पाच महिने झाले. तरी या शाळेची भिंती तशीच ठेवली आहे. मात्र, गावतील मुले अशा मोडलेल्या शाळेत शिक्षण घेत आहे. त्याची आज त्यागायत दुरुस्थी झालेली नाही. ही शाळा कधीही पडू शकते. त्यामुळे याबाबत वालूथ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता यांनाच शाळा इमारत आपल्या ग्रामपंचायत मालकीची आहे. हे सुद्धा माहीत नसल्याचे जाणवले.