प्रमोद सुकरे ।कºहाड : लोकसभा निवडणुकीची लगबग सध्या जिल्ह्यात सुरू दिसतेय! लोकसभा निवडणुकीला साताऱ्यातून कोणत्या पक्षातून कोण रिंगणात उतरणार, याचा थांगपत्ता लागेना झालाय. विधानसभा तर सहा महिने दूर आहे. तरीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याने मतदारसंघ कोणाचा? ‘उत्तर’ कोण देईल का? असा प्रश्न दस्तूरखुद्द कºहाड उत्तरमधील मतदारांना पडलाय म्हणे ! खरंतर कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण अलीकडच्या तीन ते चार वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता या बालेकिल्ल्याचे बुरूज सुरक्षित आहेत का? याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या येथे आमदार बाळासाहेब पाटील नेतृत्व करीत आहेत. ते राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने पक्ष उमेदवारीचं ‘घड्याळ’ आपल्याच हातात बांधणार, हे ग्रहीत धरत घड्याळातील काट्यांप्रमाणे प्रचाराला लागलेले दिसतात. पक्षांतर्गत दुसरा कोणी प्रतिस्पर्धीही दृष्टिक्षेपात नाही. त्यामुळे बाळासाहेब ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे बोलले जातेय. राज्यात दोन्ही काँगे्रसची आघाडी झाली आहे. तसेच सेना-भाजपची युतीही झाली आहे. राज्यात सेना भाजपला विधानसभेच्या पन्नास टक्के जागांसाठी आग्रही आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातले काँग्रेस नेतेही साताऱ्यात काँगे्रसला पन्नास टक्के वाटा मिळाला पाहिजे, यासाठी आग्रही झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-भाजपात उमेदवारीवरून धुसफूस सुरू झाली आहे.भाजपचाही ‘उत्तर’वर दावागत विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरून शिट्टी वाजविणाºया मनोज घोरपडेंनी आता भाजपचे ‘कमळ’ हातात घेतले आहे. मग दोन-अडीच वर्षांत त्यांनी भाजपच्या माध्यमातून विकासकामांचा सपाटा लावत मतदारसंघ पिंजून काढला आहे. सेना-भाजपची युती झाली असली तरी उत्तर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल, असा घोरपडेंना विश्वास आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हेसुद्धा कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघ भाजपला मिळावा, असा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरल्याचे सांगतात. गत तीन वर्षांत कºहाड उत्तरमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे मेरिटवर हा मतदार संघ भाजपला मिळेल, अशी अटकळ भाजपचे नेते बांधत आहेत. घोरपडेंनी केलेली कामे व त्यांची राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या कामाला येईल, असे कार्यकर्ते सांगतात.बानुगडे-पाटील म्हणतात ‘उत्तर’ सेनेचाचसेना-भाजपची युती झाली असली तरी कºहाड उत्तर मतदारसंघ हा पूर्वीपासून ‘सेनेकडेच’ आहे अन् तो शिवसेनेकडेच राहील, असे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील ठासून सांगत आहेत; पण काँगे्रस आघाडी विरोधात लढण्याचे ‘शिवधनुष्य’ नेमका कोणता उमेदवार उचलणार? हे निश्चित सांगता येत नाही. बानुगडे-पाटील सेनेचे उपनेते असल्याने त्यांच्यावर प्रचाराची मोठी जबाबदारी राहणार, हे निश्चित! त्यामुळे ते स्वत: रिंगणात उतरतील का? याबाबत दस्तूरखुद्द शिवसैनिकात संभ्रम आहे अन् उत्तरचे नेतृत्व करू शकेल, असे दुसरे पर्यायी नाव तरी सेनेत दिसत नाही.जयाभाऊ म्हणतात...धैर्यशीलपणे काँगे्रसकडे उमेदवारी मागाएकीकडे पृथ्वीबाबा आघाडीचा राग आळवीत असताना काँगे्रसचे दुसरे आमदार जयकुमार गोरे यांचा देखील गत महिन्यात याच मतदार संघात जाहीर कार्यक्रम झाला. काँग्रेसने नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकरही कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी गतवेळी काँग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या धैर्यशील कदमांना ‘तुम्ही पक्षाच्या माध्यमातून मतदार संघात चांगले काम केले आहे. पक्षाकडे उमेदवारी मागा अन् दिलीच नाही तर अपक्ष लढायची तयारी ठेवा,’ असे सुचित केल्याने काँगे्रस उत्तर मतदार संघ ‘हाता’ला लागतोय काय? याची चाचपणी करीत असल्याची चर्चा जोर धरू लागलीय....म्हणे पृथ्वीबाबांनी उमेदवारी जाहीर केलीगत महिन्यात कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघात एक जाहीर कार्यक्रम झाला. त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. तेथे पृथ्वीबाबांनी काँग्रेस आघाडीचा ‘राग’ आळवीत या मतदार संघात बाळासाहेबच पुन्हा उमेदवार असतील, असे संकेत दिले. पृथ्वीबाबांनी उत्तरचा उमेदवार जाहीर केला, अशा माध्यमांनी बातम्या देताच एका पत्रकार परिषदेत पृथ्वीबाबांनी त्याचा खुलासा करीत ‘मी फक्त कºहाड उत्तर आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे, असं म्हटलं. उमेदवार ठरविणारा मी कोण?’ ते काम राष्ट्रवादी पक्षाचे आहे, असे सांगितले.