आॅनलाईन लोकमत
वाई , दि. 0३ : महागणपती पुलावर वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून पाहिले जाते़ शहराच्या या पुलावर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे महागणपती पुलाचा श्वास गुदमरतोय, अशी बिकट अवस्था सध्या पाहावयास मिळत आहे़. तरी संबंधित विभागांनी यावर त्वरित उपाय शोधावा, अशी मागणी वाईकर नागरिकांची जोर धरू लागली आहे़ येथील महागणपतीला येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठी आहे़ वाई शहरातून महाबळेश्वर, पाचगणी, धोम धरण या पर्यटन स्थळांना व शहरात महागणपती हे प्रसिद्ध देवस्थान असून, मांढरदेव या देवस्थानाला शहरातून रस्ता जातो़. संपूर्ण तालुक्यातील तसेच महाबळेश्वर, पाचगणीतील लोक मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी वाई शहरात येत असल्याने सहाजिक याचा वाई शहराच्या वाहतुकीवर ताण येत असतो़ परिणामी महागणपती पुलावर सर्वच बाजंूने वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. त्यातच वाहतुकीची कोंडी होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या वाहतुकीचे नियोजन नाही़ अरुंद रस्ते बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते़ वाहतुकीची कोंडी ही आठवडा बाजार, सुट्यांच्या काळात महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांमुळे व महागणपती मंदिर परिसरात खासगी पार्किंग असल्याने व पार्किंगची कर आकरणी रस्त्यावरच केल्याने बऱ्यावेळा वाहतुकीची कोंडी होते़ तसेच आठवडा बाजारादिवशी याच पुलावर भाजी विक्रेते व इतर व्यापारी यांच्यामुळेही वाहतुकीला अडथळा होतो़. याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ वाई शहराच्या इतर भागात ही वाहतुकीची कोंडी नित्याची झाली असून, यामध्ये गंगापुरी शाहीर चौक ते किसन वीर चौक, या रस्त्यावर प्रत्येक चौकात कोंडी होत असते. ग्रामीण रुग्णालय परिसर, पोस्ट आॅफिस परिसर या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते़ यामुळे तालुक्यातील लोकांचा, भाविकांचा व पर्यटकांचा वेळ व पैसा वाया जाऊन मन:स्ताप सहन करावा लागतो़ शाळा सुरू झाल्यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते़ यामध्ये एखादे माल वाहतूक करणारे मोठे वाहन आले की तासन्तास वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहावयास मिळते़ त्यामुळे प्रशासनाने वाढत्या वाहतुकीच्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून येत आहे़ दरम्यान, वार्ई शहरातून जाणारा चौपदरी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ब्रिटिशकालीन वडाच्या झाडांना तोडण्यास सामाजिक संस्थांचा तीव्र विरोध असून, ग्रीन स्पीड ब्रेकरची संकल्पना राबवावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे़
वाहतूक कोंडीच्या नावाखाली ब्रिटिशकालीन वृक्षतोड थांबवावी
वाहतुकीची कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. यामुळे पादचाऱ्यांना व शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो़ प्रशासनाने ठोस उपाययोजना करून समस्या सोडवावी. दरम्यान, वार्ई शहरातून जाणारा चौपदरी रस्त्याकडेला असणाऱ्या ब्रिटिशकालीन वडाच्या झाडांना तोडण्यास सामाजिक संस्थांचा तीव्र विरोध असून, ग्रीन स्पीड ब्रेकरची संकल्पना राबवावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे़ - दिलीप डोंबिवलीकर,
सदस्य, कृष्णाई सोशल फोरम शनिवार, रविवार व सुट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत असतात. त्यामुळे प्रवाशांना व स्थानिक नागरिकांचा वेळ वाया जातो व मन:स्ताप सहन करावा लागतो़ त्यामुळे उपाययोजना करून नागरिकांना, पर्यटकांना प्रशासनाने दिलासा द्यावा.- डी़ एम़ पाटील, व्यावसायिक