सातारा : विटा-महाबळेश्वर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे केळघर घाटातील काम गेल्या दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
कडबा वाहतुकीने धोका
सातारा : सध्या रब्बी हंगामातील सुगी अंतिम टप्प्यात आली असून, ज्वारी उत्पादक पट्ट्यातील कडब्याची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धोकादायक वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
ऑनलाईन वर्गात व्यत्यय
सातारा : ग्रामीण भागासह शहरातही इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन वर्गात व्यत्यय येत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपली सेवा सुधारावी, अशी अपेक्षा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.
पथदिव्यांची मागणी
सातारा : गोडोली परिसरातील साईमंदिर झोपडपट्टीसह अन्य परिसरात पथदिवे बसवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. सातारा शहर हद्दवाढीत हा भाग समाविष्ट झाल्यानंतर स्थानिकांची अपेक्षा पालिकेकडून वाढली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील अंधार दूर करावा, अशी मागणी होत आहे.
शिक्षकांना सकाळीच बोलवा
सातारा : उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना सकाळच्या सत्रात बोलाविण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भुईंजला वर्धिनींचा सन्मान
सातारा : भुईंज (ता. वाई) येथे गौतमी स्वयंसहाय्यता महिला समूहाच्यावतीने वर्धिनींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी वनिता धीवर, सोनाली खरात, सुवर्णा कांबळे, गीता पवार आदी उपस्थित होते.