सातारा : किरकोळ कारणातून पत्नीने पतीला काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पत्नीविरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित पती आणि पत्नी सातारा जिल्ह्यात राहत आहेत. यामधील पत्नीने किरकोळ कारणातून राहत्या घरी पतीला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत घरातील जिन्यावरून खाली ढकलून दिले. यामध्ये पती जखमी झाला आहे. याप्रकरणी पतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस जाधव करीत आहेत.
पत्नीने पतीला काठीने मारहाण करत दिले जिन्यावरुन ढकलून, गुन्हा दाखल; साताऱ्यातील घटना
By नितीन काळेल | Published: December 16, 2022 3:45 PM