खंडाळा : ‘अहिरे गावाला राजकीय पार्श्वभूमी आहे. गावातील अनेकांनी राजकारणातील उच्च पदे भूषविली आहेत. त्यामुळे गाव विकासाच्या प्रवाहात कायम राहिले आहे. तरीही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. गावचा विस्तार मोठा असला तरी भविष्यात मूलभूत विकासकामे निश्चितपणे पूर्ण केली जातील,’ असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले .
अहिरे ता. खंडाळा येथील मज्जीद सभामंडप, लक्ष्मीमाता मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन तसेच गावच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, उद्योजक नितीन ओव्हाळ, सरपंच रवींद्र सोनवणे, उपसरपंच दयानंद धायगुडे, सचिन धायगुडे, अनिल धायगुडे, सदस्या स्नेहा मोहिते, रूपाली जाधव, विशाल धायगुडे, लतिफ काझी, जाकीर काझी, मुकुंद धायगुडे, प्रताप धायगुडे, प्रमोद होले, ग्रामसेवक मल्हारी शेळके, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, ‘अहिरे गावच्या प्रवेशद्वारावर हे सभामंडप होत असल्याने गावच्या वैभवात भर पडणार आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेऊन काम केल्यास विकास गतिमान होतो. अहिरे गाव नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांची पाठराखण करणारे आहे. त्यामुळे येथील विविध रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. वाडी-वस्तीवर कुटुंबे विखुरली जात असल्याने त्यांनाही सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध आहोत.
(चौकट)
रस्ते होणार हिरवेगार...
अहिरे गावातील विकासकामांसह वृक्षारोपणाचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वृक्षलागवड केली जाणार असल्याने रस्ते हिरवेगार बनणार आहेत. यासाठी वड, पिंपळ, चिंच, लिंब या देशी झाडांची निवड करण्यात आली आहे.
.........................................
२८खंडाळा
अहिरे, ता. खंडाळा गावच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.