शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

सुपनेतील पाणंद रस्ता अखेर खुला

By admin | Published: October 15, 2016 11:46 PM

शेतकऱ्यांची सोय : मुरूमीकरणामुळे पायपीट वाचणार

कऱ्हाड : सुपने, ता. कऱ्हाड येथील पाणंद रस्ता खुला करण्यात आला असून, रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या रस्त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांची सोय होणार असून, त्यांची पायपीट वाचणार आहे. सुपने येथील बांबुगडे शिवार ते ज्योतिर्लिंग मंदिरानजीकच्या नरसोबा शिवारापर्यंत पाणंद रस्ता असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून पायी चालत जाणेही मुश्कील झाले होते. हा रस्ता खुला करून त्याचे मुरूमीकरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकताच हा रस्ता खुला करण्यात आला आहे. त्याचे मुरूमीकरणही करण्यात येणार आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच स्वाती माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, मंडलाधिकारी पंडित पाटील, तलाठी जाधव, उपसरपंच विनोद शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत म्होप्रेकर, बी. के. पाटील, जयवंत पाटील, अरुण पाटील, प्रकाश शिंदे, सूरज शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ‘सुपने येथील शिवारामध्ये अनेक पाणंद रस्ते आहेत. काही रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने संबंधित रस्ते वापरात येत नव्हते. परिणामी, शेतकऱ्यांना पायपीट करीत दुसऱ्या रस्त्याने जावे लागत होते. मात्र, सध्या अनेक रस्ते खुले करण्यात आले आहेत. तसेच काही रस्त्यांचे मुरूमीकरण करण्यात आले आहे. काही रस्त्यांचे खडीकरण झाले आहे. त्यामुळे संबंधित रस्ता दैनंदिन वापरात येत आहे. गावातील सर्वच पाणंद रस्ते खुले करून त्यांचे मुरूमीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)