सातारा : मराठा आरक्षणासाठी बुधवारी साताऱ्यात दंगल उसळली. याप्रकरणी ३४ पोलीस जखमी झाले. तर २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. साताºयात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८३ जणांना ताब्यात घेऊन २५०० हजार लोकांवर ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्यांसह एकूण २० कलमे लावली आहेत. या कलमांनुसार आरोपींना जामीन मिळत नाही.दंगलीच्या वेळी क्षणीक भावनेतून एक दगड टाकला तर तीन महिन्यांसाठी आत जावे लागते. याला जामीनही मिळत नाही. यामुळे तरुणांचे करिअर धोक्यात येऊ शकते.सहभागी नसलेलेही भरडले..अटक केलेले ५८ संशयित व ताब्यात घेतलेल्या १३ अल्पवयीन मुलांपैकी काहीजण त्या ठिकाणी नव्हते. त्यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली नसून परिसरातून पकडले आहे. त्यापैकी अनेकजण दवाखाना, महाविद्यालय व नोकरीवरून घरी जात होते. तर काहीजण तर रस्त्याने चालत किंवा वाहनाने जात असताना त्यांना पकडण्यात आले.तर काही तरुण नेमके काय चाललेले आहे, हे पाहत असताना त्या बघ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, असा आरोप अटकेत व ताब्यात असलेल्या तरुणांच्या नातेवाइकांनी केला आहे.पोलिसांनी लावलेली कलमे..कलम ३०७ खुनाचा प्रयत्न हा गुन्हा अजामीनपात्र असून, त्यासाठी आजीवन कारावास किंवा दहा वर्षांचा कारावास व दंड अशी शिक्षा आहे.कलम ३३२ लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे हा गुन्हा अजामीनपात्र असून, त्यासाठी तीन वर्षांचा कारावास अशी शिक्षा आहे.
कलम ३५३ लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हमला किंवा बलप्रयोग करणे हा अजामीन पात्र असून, त्याला दोन वर्षांच्या कारावसाची शिक्षा आहे.
कलम ५०४ शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणेकलम ५०६ धाकदपटशाबद्दल अपराध१४१ सार्वजनिक प्रशांततेविरोधी अपराध१४८ प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन दंगा करणे१४९ समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमाव२९१ सार्वजनिक उपद्रव थांबविण्याबाबतच्या आदेशानंतरही तो चालू ठेवणे१३५ लष्करातील अधिकारी व कर्मचाºयांना पळून जाण्यास चिथावणी देणेआदी कलमान्वये आंदोलनकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.