सातारा : बारावकरनगर, शिवराज पेट्रोल पंप परिसरात खासगी सावकारी करत चौघांनी महिलेस पिस्तुलाचा धाक दाखवून कपाटातील पाच लाख रुपये हिसकावल्याची घटना घडली.
अजमेर अकबर मुल्ला (रा. नागठाणे, ता. सातारा), लाला पंडित, सचिन नलवडे (दोघे रा. सातारा) व आणखी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की, संतोष कृष्णात घाडगे (वय ४१, मूळ रा. कामेरी, ता. सातारा, सध्या रा. आशा कॉलनी, बारावकरनगर, सातारा) यांनी अजमेर मुल्ला याच्याकडून व्यवसायासाठी दीड लाख रुपये घेतले होते. त्याची वेळोवेळी परतफेड करत असताना अजमेर, लाला पंडित व सचिन नलवडे यांनी कारमधून (एमएच १२ सी २२००) नागठाणे येथे नेले. त्याठिकाणी शिवीगाळ करत पट्ट्याने व दुचाकीच्या केबलने मारहाण केली. त्यानंतर चौघे संतोष घाडगे यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कपाटातील पाच लाख रुपये काढून जबरदस्तीने घेऊन गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नानासाहेब कदम करीत आहेत.
सराईत गुन्हेगाराकडून जिवंत काडतुसे जप्त -स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पानटपरीत आढळलेसातारा : सातारा शहरातील तांदूळआळी परिसरातील एका पानटपरीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार शिवा बाळू अहिवळे (वय २८, रा. मंगळवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यात एकाकडे विनापरवाना बंदुकीच्या गोळ्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांदूळआळीतील शिवराज पानटपरीवर छापा टाकला.टपरी चालकाकडे चौकशी करून पानटपरीची झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी दोन्ही जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. संबंधित बंदुकीच्या एका गोळीवर ‘१९४३ सीएसी’ कंपनी तर दुसºया गोळीवर ‘१९४४ जीआयआय’ कंपनी असे नाव कोरलेले आढळले आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस हवालदार प्रवीण फडतरे, शरद बेबले, नीलेश काटकर, एम. एम. देशमुख, एम. एन. मोमीन, एस. पी. जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याला बुधवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शिवावर गंभीर गुन्हेशिवा अहिवळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गर्दीत मारामारी आणि चोरीसारखे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची झडती घेत असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांला खाक्या दाखवल्यानंतर त्याने काडतुसे काढून दिली.