कऱ्हाडात शिवजयंतीचा अलोट उत्साह : सार्वजनिक मंडळांकडून शिवमूर्तींची प्रतिष्ठापना; आकर्षक कमानींसह भगव्या रांगोळ्याकऱ्हाड : शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त प्रत्येक रस्त्यावर आणि मुख्य चौकात भगवे झेंडे तसेच भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. काही मंडळांनी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून आकर्षक सजावट केली होती. तर दत्त चौकासह मंगळवार पेठेत रस्त्यावर भव्यदिव्य आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. कऱ्हाडला दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी शहरातील अनेक सार्वजनिक मंडळे या शिवजयंतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. आकर्षक देखाव्यांसह विद्युत रोषणाई करून सजावटीतून चौकाचौकात शिवमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी ही शहरातील अनेक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावटी केल्या आहेत. गत आठवड्यापासून शहरात शिवजयंतीची तयारी सुरू होती. मंडळांच्या स्टेज उभारणीचे तसेच सजावटीचे काम सुरू होते. दत्त चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच भगव्या पताकाही लावण्यात आल्या.शहरातील यशवंत हायस्कूलनजीकच्या अजंठा ग्रुप मंडळाने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, मूर्तीसमोर पिंडीचीही प्रतिष्ठापना केली आहे. या ठिकाणची सजावट नागरिकांचे लक्ष वेधून घेते. रविवार पेठेतील भोई गल्लीमध्ये असणाऱ्या आदीमाया मंडळाने समरभूमी उंबरखिंडीचा इतिहास शिल्पाच्या माध्यमातून उभा केला आहे. तसेच परिसरात भगवे झेंडे उभारले आहेत. कमानी मारुती मंडळाने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच फुलांची आकर्षक सजावट केली आहे. या सजावटीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सोमवार पेठेतील कन्या शाळेसमोर भगवा रक्षक ग्रुपने राजमहाल उभारला आहे. या भव्य प्रतिकृतीने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच प्रतिकृतीसमोर कारंज्याही उभारण्यात आला आहे. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. मंगळवार पेठेत मुख्य बाजारपेठ मार्गावर भगवे वादळ पाहावयास मिळत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस भगवे झेंडे तसेच भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत. पेठेतील भवानी मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. तसेच उदय गणेश मंडळाने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून स्टेजला सजावट केली आहे. ज्योतिर्लिंग गणेश मंडळाने राजदरबार तयार केला आहे. शिवमूर्तीसमोर हत्ती, घोडे तसेच सैनिकांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मध्यभागी भगव्या झेंड्यांची सजावट करण्यात आली आहे. भारमाता गणेश मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सोमवार पेठेतील पावसकर गल्लीतील श्रीकृष्ण गजानन मंडळ, राधा महिला मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ अठरा फूट उंचीची आकर्षक मूर्ती स्थापित केली आहे. ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. (प्रतिनिधी)
युवतीशी लगA मोडून खंडणी घेतली!
By admin | Published: April 29, 2017 12:02 AM