शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

दोन गटांतील संघर्षात महिलेचा खून

By admin | Published: January 28, 2015 11:16 PM

कवठे येथील घटना : कपडे, साहित्य अस्ताव्यस्त; मृतदेह उसात फेकला

कवठे : पारधी समाजातील दोन गटांत झालेल्या संघर्षात एका महिलेचा खून झाल्याची घटना आज, बुधवारी उघडकीस आली. महिलेचा मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याचे आढळून आले, तर दोनपैकी एका गटातील लोकांचे सामानसुमान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आल्याने दोन गटांतील संघर्षात महिलेचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील तळेपाळी शिवारातील जमीन शंकर आप्पा डेरे यांची असून, ती गहाणखताद्वारे कृष्णराव डेरे कसत आहेत. या जमिनीत ऊस लावला असून, त्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याची फिर्याद जितेंद्र शंकर डेरे यांनी भुर्इंज पोलीस ठाण्यात दिली. पोलीस घटनास्थळी आले असता या महिलेचा श्वासोच्छ््वास सुरू असल्याचे दिसून आले. तिला तातडीने कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, राजपारधी समाजाचे सुमारे दीडशे लोक या शिवारात दोन ते तीन दिवस मुक्कामाला होते. त्यांचे दोन गट होते. दोन्ही ठिकाणी १७ चुली आढळून आल्या. अरविंद नामदेव डेरे यांच्या शेतात राहत असलेल्या गटाच्या मुक्कामाच्या ठिकाणी भांडी व अन्य साहित्याची मोडतोड झाल्याचे दिसून आले. त्यावरून या ठिकाणी दोन गटांत मारामारी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला.घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर उसाच्या आठव्या सरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणची ओली व सुकी माती पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच घटनास्थळी लाकडी दांडके व चेपलेली भांडी आढळून आली. यावरून एका गटाने पलायन केले असावे आणि दुसऱ्या गटातील लोकांनी महिलेला उसात नेऊन टाकले असावे, असा अंदाज आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. पवार व इंगवले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याकामी विलास डेरे, मिलिंद जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पोळ, तुषार भागवत, जितेंद्र डेरे यांनी सहकार्य केले. सोपस्कार पूर्ण झाल्यावर मृतदेहाचे दफन करण्यात आले. (वार्ताहर)निरगुडीच्या डहाळ््यांचे रहस्यया दोन गटांच्या राहण्याच्या ठिकाणापासून मृतदेह सुमारे पाचशे फूट अंतरावर ज्या ठिकाणी टाकण्यात आला होता, तेथपर्यंतच्या मार्गावर निरगुडीचे डहाळे आढळून आले आहेत. हे डहाळे १५ ते २० फुटांच्या अंतराने ठेवण्यात आले होते. त्यावरून माग काढतच पोलीस खुनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले. मात्र, हे डहाळे कुणी आणि कशासाठी ठेवले होते, याचा शोध आता घेतला जात आहे.