शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Published: January 23, 2017 11:40 PM

जयकुमारांच्या पीएची फिर्याद : विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण शक्य

सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली. प्रदीप जाधव (दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि सातारा येथील महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाल्याने आमदार गोरेंवर दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविणे हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात येऊन अटकही झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आमदार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांनी प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि सातारा येथील एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली. अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत शेखर गोरे यांचा पराभव झाला. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा धुळीस मिळाले. त्यामुळे विरोधक आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी माझ्याशी संपूर्ण साधून व दहिवडी येथे समक्ष भेटून तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक द्या. रक्कम न दिल्यास आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असे सांगितले. प्रदीप जाधव यांच्या सांगण्यावरून मी विवेकानंद सावंत यांच्याशी नवी मुंबई येथील रघुलीला मॉलमधील रेस्टॉरंटमध्ये चर्चा केली. मला त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. आमदार गोरे यांचे सातारा जिल्ह्यातील विरोधक त्या महिलेला मोठ्या रकमा देण्याचे आश्वासन देत आहेत, असे सावंत यांनी मला सांगितले. त्यानंतर प्रदीप जाधव यांनी मला दहिवडी येथे सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत पुढे काय झाले, अशी विचारणा केली. लवकर रक्कम देऊन विषय संपवा, असेही सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेने मला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करुन भेटण्यासंदर्भात विचारले. १ आॅक्टोबर २०१६ रोजी मला सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे भेटण्यास बोलविले. त्यावेळी महिलेने सावंत यांच्याशी झालेली चर्चा परत नसल्याचे व लीगल प्रोसेस करण्याची धमकी दिली, अशाप्रकारे प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि महिलेने संगनमत करुन आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकविण्याची भीती घालून, मोठ्या रकमेची मागणी करुन वसूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत अभिजित काळे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात ब्लॅकमेलिंग व खंडणीची तक्रार दाखल केली.पोलिसांनी भारतीय दंडसंहिता १८६० नुसार कलम ३२५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून घेतला. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत.