सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण, महाड या सर्व जिल्ह्यांना सध्याच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. साताऱ्यातील महिला डॉक्टरांनी अतिशय वेळेत तत्परतेने मदतकार्य केले आहे. आनंदीता व आयएमए साताराच्या अतिशय जिद्दी व कष्टाळू कार्यकर्त्या डॉ. दीपांजली पवार, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि संघटना स्वतः जाऊन पूरग्रस्त लोकांना मदत करीत आहेत, तसेच संवादही साधत आहेत.
युथ फॉर डेमोक्रँसी या गटाने चिपळूणच्या मदतीचे संयोजन आणि वाटप केले. हिरकणी फौंडेशनच्या मदतीने जावळी भागात मदत केली. डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. दीपांजली पवार यांनी स्वत: मेढा तालुक्यातील चार गावांत मदत केली.
१९८५ स्नेहबंध ग्रुप, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलतर्फे आपली मैत्रीण डॉ. नूतन यांनी आताच दहा हजार रुपये निधी मदत कार्यासाठी पाठविला आहे. त्याबद्दल आनंदीता लेडी डॉक्टर्स फोरम आणि आयएमए सातारा लेडी डॉक्टर्स विंग यांच्यावतीने मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.