सातारा : महिला पोलिस अधिकाऱ्याशी उद्धट वर्तन केल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी महिला पोलिस नाईक रूपाली मस्के यांना निलंबित केले.पोलिस परेड मैदानावर सध्या पोलिस भरती सुरू आहे. लांबउडी प्रकाराची शारीरिक चाचणी घेण्यासाठी इव्हेंट प्रमुख म्हणून सहायक पोलिस निरीक्षक डी. टी. जैंजाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस भरतीवेळी रूपाली मस्के यांनी जैंजाळ यांच्याशी बेशिस्त वर्तन केले, तसेच वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मस्के यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी. एस. बेदरे यांना देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
उद्धट वर्तनप्रकरणी महिला पोलिस निलंबित
By admin | Published: March 29, 2017 11:34 PM