शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

स्त्रियांनी दडपण न ठेवता अन्यायाला वाचा फोडावी : तेजस्वी सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:10 PM

‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत होईल.

ठळक मुद्देजिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘महिला सुरक्षा विषयावर’ कार्यशाळेचे आयोजन

सातारा : ‘आजही आपल्या समाजातील महिलांना स्वत:विषयी असलेल्या कायद्यांची माहिती नाही. आपल्यावर अन्याय झाला तरी त्या अन्यायाला सामाजिक दडपणापोटी कुठेही दाद मागत नाहीत, ही मानसिकता बदलली पाहिजे,’ असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते बोलत होत्या. या कार्यशाळेला दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुंभोजकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखडकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समन्वयक अ‍ॅड. मनीषा बर्गे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सातपुते पुढे म्हणाल्या, ‘वाढत्या महिला अत्याचारांबाबत समाजही सकारात्मक जागृत होत असल्याचे चित्र आहे. समाजामधील ज्या महिलांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे, अशा महिलांच्या प्रेरणादायी यशकथांना माध्यमांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी, यामुळे महिलांच्या विकासाला मदत होईल. तसेच शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे.’जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अ‍ॅड. सुचित्रा घोगरे-काटकर यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांसाठी ताकदीचे कायदेही अस्तित्वातपुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून महिला काम करीत आहेत. ज्या ठिकाणी महिला काम करीत आहे, अशा ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती असते. अत्याचार झाल्यास या समितीकडे दाद मागावी. १८ वर्षांखालील लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींना तीन लाखांपर्यंतची मनौधैर्य योजनेंतर्गत मदत केली जाते. महिला सुरक्षेबाबत शासन तत्पर असून, जेवढ्या प्रमाणात समाजामध्ये विकृती येत आहे, तेवढ्याच ताकदीचे कायदेही अस्तित्वात येत आहेत. अत्याचारग्रस्त महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी व सहाय्य दिले जाते, याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुंभोजकर यांनी केले.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस