आगाशिवनगर येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात कोरोना जनजागृती या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून महिलांची आरोग्य तपासणी व कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. यशोदा पाटील, भाजपा नगरसेविका निर्मलाताई काशीद, महिला अध्यक्षा डॉ. सारिका गावडे, डॉ. मनीषा वाठारकर, प्रियांका जंत्रे, सुनीता देसाई, सुलोचना भिसे, विजया पोटे, अंजली पाकले, लता जाधव, रंजना काटवटे, शर्मिला श्रीखंडे, रेखा यादव, विशाखा सुतार, अरुणा कुंभार, उर्मिला थोरात, सीमा खाडे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. स्वाती थोरात यांनी, कोरोना काळात आपण प्रतिबंधात्मक लसीचा वापर करणे, स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर करणे का आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन केले. कोरोनाला हरवण्यासाठी एकमेकांमध्ये चार फुटांचे अंतर ठेवणे व मास्कचा वापर या एकमेव सूत्राचा वापर करणे आवश्यक आहे. आपला जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे लोकांची सेवा करीत आहेत. अशा स्थितीत सुजाण नागरिक म्हणून त्यांना आपण साथ दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मळाई ग्रुपच्यावतीने शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार उपस्थित महिलांना मान्यवरांच्याहस्ते सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक ज्योती शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा खंडागळे यांनी केले, तर अरुणादेवी गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो : ०९केआरडी०२
कॅप्शन : आगाशिवनगर येथे जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात मळाई महिला विकास मंचच्या अध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांच्याहस्ते महिलांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.